विधी प्रवेश परीक्षेत दिव्यांशू भारतात चौथा

By Admin | Updated: June 17, 2016 02:03 IST2016-06-17T02:03:41+5:302016-06-17T02:03:41+5:30

संपूर्ण भारतातून विधी प्रवेश परीक्षेत मागासवर्गीयातून चौथा मेरीट येण्याचा बहुमान दिव्यांशू रामरतन बडोले याने पटकाविला आहे.

Diwali is the fourth in India | विधी प्रवेश परीक्षेत दिव्यांशू भारतात चौथा

विधी प्रवेश परीक्षेत दिव्यांशू भारतात चौथा

गोंदिया : संपूर्ण भारतातून विधी प्रवेश परीक्षेत मागासवर्गीयातून चौथा मेरीट येण्याचा बहुमान दिव्यांशू रामरतन बडोले याने पटकाविला आहे. बुधवारी त्याला हा निकाल मिळाला.
नक्षलग्रस्त आदिवासी भागातील देऊळगाव (चिचगड), तालुका देवरी हे त्याचे आजोळ आहे. दहावी, बारावीनंतर सर्वाचा कल इंजिनिअरींग अथवा वैद्यकीय क्षेत्राकडे असताना दिव्यांशूने सामाजिक न्यायासाठी सीएलएटी ‘कॉमन लॉ अप्टीट्युड टेस्ट’ ही पात्रता परीक्षा पहिल्याच फेरीत उत्तीर्ण केली. २०० गुणांपैकी १४०.२५ गुण प्राप्त करून तो विधी अभ्यासक्रमासाठी नावाजलेल्या नॅशनल लॉ स्कूल आॅफ इंडिया, युनिव्हीसीटी बंगलोर येथे तो आता पुढील शिक्षण घेणार आहे. वडील रामरतन बडोले हे सुध्दा भारतीय रेल्वेत मॅकेनिकल इंजिनिअर असून आई जे.जे.हॉस्पीटल मुंबई येथे प्रोफेसर आहे. मोठे होऊन सामाजिक न्यायासाठी कार्य करण्याचा आपला मानस आहे, असे त्याने मुलाखतीत सांगितले. यशाचे श्रेय तो आई-वडील व सर्व मित्र परिवारास देतो. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Diwali is the fourth in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.