जिल्ह्यात स्थापन होणार ५६१ दुर्गा, ५५१ शारदा

By Admin | Updated: September 24, 2014 23:36 IST2014-09-24T23:36:00+5:302014-09-24T23:36:00+5:30

नवरात्रौत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. जिल्ह्यात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्ती स्थापन केल्या जाणार आहे. या उत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त

The district will be established in 561 Durga, 551 Sharda | जिल्ह्यात स्थापन होणार ५६१ दुर्गा, ५५१ शारदा

जिल्ह्यात स्थापन होणार ५६१ दुर्गा, ५५१ शारदा

गोंदिया : नवरात्रौत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. जिल्ह्यात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्ती स्थापन केल्या जाणार आहे. या उत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे सदस्य उत्सव मंडळांना सहकार्य करणार आहेत.
गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ३५ दुर्गा, ३० शारदा, ६ ठिकाणी गरबा व ४ ठिकाणी रावणदहन करण्यात येणार आहे. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४५ दुर्गा, ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात २० दुर्गा, २० शारदा, ५ ठिकाणी गरबा होणार आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५७ दुर्गा, २८ शारदा स्थापन होणार आहे.
आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ७० दुर्गा, ३५ शारदा, २ ठिकाणी गरबा होणार आहे. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ६९ दुर्गा, ३८ शारदा स्थापन होणार आहे.देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १० दुर्गा, ५७ शारदा, १ ठिकाणी गरबा करण्यात येणार आहे. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १२ दुर्गा, ४० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १५ दुर्गा, ६४ शारदा स्थापन करण्यात येणार आहे.
गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५० दुर्गा, ४० शारदा, १० ठिकाणी रावणदहन करण्यात येणार आहे.नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५ दुर्गा, २५ शारदा, १ ठिकाणी गरबा करण्यात येणार आहे. अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात २३ दुर्गा, ४५ शारदा, १ ठिकाणी गरबा होणार आहे. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १० दुर्गा, ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे.
तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४५ दुर्गा, ३५ शारदा, २ ठिकाणी गरबा होणार आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४० दुर्गा, ८ शारदा, ३ ठिकाणी गरबा होेणार आहे. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५५ दुर्गा, १६ शारदा, १ ठिकाणी गरबा होणार आहे.
दुर्गा किंवा शारदा देवीच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी उत्सव मंडळांबरोबर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या पुढाकार घेणार आहेत. जिल्ह्यात २२ ठिकाणी गरबा खेळला जाणार आहे, तर १४ ठिकाणी दसऱ्याला रावणदहन करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The district will be established in 561 Durga, 551 Sharda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.