‘वाचन-आनंदा’त जिल्हा दंग
By Admin | Updated: September 9, 2016 01:54 IST2016-09-09T01:54:37+5:302016-09-09T01:54:37+5:30
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये गुरूवारी दप्तरविरहीत दिन ‘वाचन आनंद दिन’ म्हणून पाळण्यात आला.

‘वाचन-आनंदा’त जिल्हा दंग
राज्यासाठी दिशादर्शक : दप्तर न आणता विविध पुस्तकांचे केले वाचन
गोंदिया : जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये गुरूवारी दप्तरविरहीत दिन ‘वाचन आनंद दिन’ म्हणून पाळण्यात आला. १६८४ शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सर्व विद्यार्थी विविध प्रकारची पुस्तकेच वाचन्यात दंग झाल्याचे चित्र पहायला मिळाले. संपूर्ण राज्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरला.
विशेष म्हणजे विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह वाढविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आमगाव तालुक्याच्या पदमपूर जि.प. शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांंना दररोजच्या दप्तराच्या ओझ्यापासून एक दिवसासाठी का असेना, दिलासा मिळाल्याने त्याचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये दिसत होता.
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने अनेक वेळा वाचन दिवस, वाचन कट्टा तयार केला. अक्षर सुधारण्यासाठी अक्षर सुधार कार्यक्रम घेतले. पुन्हा एकदा गोंदिया शिक्षण विभागाने जिल्ह्यातील वर्ग १ ते १२ वी च्या शाळांत वाचन आनंददिन साजरा केला आहे. या प्रेरणेतून अख्या महाराष्ट्रात १५ आॅक्टोंबरला ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे ठरविले. राज्यातील २ कोटी विद्यार्थी अवांतर पुस्तकाचे वाचन करणार आहेत. मुक्त वातावरणात संचरणाऱ्या विद्यार्थ्यांनी मौज करीत वाचन आनंद दिवसाचा फायदा घेत विविध जवषयाची पुस्तके हाताळली. तज्ज्ञ अजधकाऱ्यांचे मार्गदर्शनही त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले. बड्या अधिकाऱ्यांनी आपण जि.प. च्या शाळातून कसे घडलो याची माहिती विन्यार्थ्यांना दिली. आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, त्यांचे वडील नामदेवराव सुर्यवंशी, आई सुशीला सुर्यवंशी, जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, तहसीलदार साहेबराव राठोड, पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पं.स. सदस्य जयप्रकाश शिवणकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी खुमेंद्र बोपचे, मुख्याध्यापक शरद पुल्लरवार व शिक्षक उपस्थित होते. प्रत्येक शाळेत अधिकारी व पदाधिकारी उपस्थित झाले होते. शैक्षणिक वाचनाचा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला.
तालुका व जिल्हास्तरावर पर्यवेक्षीय यंत्रणेशी संपर्क करण्याकरिता व कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होईल याची खात्री करण्याकरीता नोडेल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)