जिल्ह्यातील सुरक्षा रामभरोसे, ६६३ लोकांमागे एक पोलीस (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:31 IST2021-02-09T04:31:58+5:302021-02-09T04:31:58+5:30

गोंदिया : शिस्त, गस्त आणी बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांच्या डोक्यावर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात आहे. या कामाच्या तणावाखाली असलेल्या पोलिसांना ...

District security Rambharose, one policeman (dummy) behind 663 people | जिल्ह्यातील सुरक्षा रामभरोसे, ६६३ लोकांमागे एक पोलीस (डमी)

जिल्ह्यातील सुरक्षा रामभरोसे, ६६३ लोकांमागे एक पोलीस (डमी)

गोंदिया : शिस्त, गस्त आणी बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांच्या डोक्यावर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात आहे. या कामाच्या तणावाखाली असलेल्या पोलिसांना विविध आजार जडतात. आपले आजार घेऊन २४ तास नोकरी करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या हक्काचीही सुटी उपभोगता येत नाही. आपल्या हक्काच्या सुटीसाठी पोलीस अधिकाऱ्यांची जी हुजूरी करावी लागते. त्याशिवाय त्यांना सुटी दिली जात नाही. गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असून, गोंदिया जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पोलीस यंत्रणा नाही. त्यामुळे नोकरी करणाऱ्या पोलिसांवर कामाचा मोठ्या प्रमाणात ताण आहे. शिवाय तोकड्या पोलीस यंत्रणेमुळे गोंदिया जिल्ह्याची सुरक्षा रामभरोसे आहे. गोंदियाा जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाख ५३ हजार ३३२ आहे. या नागिरकांच्या सुरक्षेसाठी शासनाने २ हजार ३६० पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर केली आहेत. परंतु यापैकी १७० पोलीस कर्मचारी सेवानिवृत्ती व अन्य कारणाने रिक्त आहेत. सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यात २ हजार १९० पोलीस कर्मचारी कार्यरत असून, ६६३ नागिरकांच्या मागे एका पोलीस आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे, रेतीमाफीये यांचे मनोबल वाढले आहे. मारामाऱ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. सरकारने मागील अनेक वर्षांपासून पोलीस कर्मचाऱ्यांची पदभरती घेतली नाही. कामाच्या व्यापात पोलिसांना तणावात काम करावे लागते.

बॉक्स

बंदोबस्तासाठी अधिक वेळ जात असल्याने तपास मागे पडतो

गोंदिया जिल्ह्यात राजकारण्यांचा वरदहस्त असल्याने राज्यातील मंत्र्यांपासून देशातील केंद्रस्तरावर असलेल्या मंत्र्यांचेही दौरे गोंदिया जिल्ह्यात होतात. त्या मंत्र्यांचा बंदोबस्त करण्यात या पोलिसांचा वेळ जातो. सोबतच या पोलिसांवर विविध गुन्ह्यांचा तपास, अवैध धंद्यांवर आळा, खून, बलात्कार, अनोळखी मृतदेहांची ओळख पटविणे हे कामे मागे पडतात. बंदोबस्तासह इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांना २४ तास नोकरी करूनही तो वेळ अपुरा पडत आहे.

..........

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४५३३३२

जिल्ह्यातील पोलीस संख्या २१९०

.............

बॉक्स

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात गोंदिया...... स्थानावर

.........

कोट

शासनाने गोंदिया पोलिसांवर साेपविलेली जबाबदारी पोलीस यशस्वीरित्या पार पाडत आहेत. शासनाच्या नियमानुसार कामकाज केले जाते. गोंदिया जिल्ह्यात काम करताना कुठल्याही पोलिसांवर कामाचा ताण नाही. सर्व गुन्हे उघडकीस आणून सर्व बंदोबस्तही उत्तमरित्या आम्ही पार पाडत आहोत.

विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया.

Web Title: District security Rambharose, one policeman (dummy) behind 663 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.