जिल्ह्यात ३० टक्केच रोवणी
By Admin | Updated: July 22, 2016 02:38 IST2016-07-22T02:38:44+5:302016-07-22T02:38:44+5:30
मान्सून यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांची परीक्षाच घेत आहे. सरासरी पावसाच्या अभावामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३० टक्केच खरिपाच्या धान पिकांची रोवणी झाली आहे.

जिल्ह्यात ३० टक्केच रोवणी
आतापर्यंत ४२३.८ मिमी पाऊस : शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडेच लागलेले
गोंदिया : मान्सून यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांची परीक्षाच घेत आहे. सरासरी पावसाच्या अभावामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३० टक्केच खरिपाच्या धान पिकांची रोवणी झाली आहे. त्यामुळे आताही शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडेच लागलेल्याच आहेत.
जिल्ह्यात जून महिन्यापासून २१ जुलैपर्यंत सरासरी ४२३.८ मिमी पाऊस नोंदविण्यात आले आहे. जून महिन्यात जिल्ह्यात २००.५ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित होते. परंतु ९५.४ मिमी (४७.६ टक्के) पाऊस पडले. याच प्रकारे जुलै महिन्याच्या २१ तारखेपर्यंत ३३०.८ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत ३२९.४ मिमी (९९.६ टक्के) पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या धान रोवणीचे काम थांबलेले आहे. केवळ ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाचे साधन आहेत, तेच धान रोवणी करीत आहेत. मान्सूनची स्थिती अशीच राहिली तर खरिपाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनही कमी होईल.
जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७८ हजार २२९ हेक्टर असून आतापर्यंत ५४ हजार २६५.४० हेक्टरमध्येच (३० टक्के) रोवणी करण्यात आली आहे. यापैकी ९९६३.२० हेक्टरमध्ये आवत्या व ४२७६५.२० हेक्टरमध्ये रोवणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात गोंदिया तालुक्याच्या सर्वसाधारण क्षेत्र ३९ हजार ६११ हेक्टरपैकी सात हजार ५६७ हेक्टर, गोरेगाव येथील सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ९२१ हेक्टरपैकी चार हजार ४८४ हेक्टर, सालेकसा येथे सर्वसाधारण १६ हजार ८८९ पैकी सहा हजार ९५० हेक्टर, तिरोडा येथे २४ हजार २४५ पैकी सात हजार ९९९ हेक्टर, आमगाव येथे १९ हजार २४८ पैकी पाच हजार ०४४ हेक्टर, अर्जुनी-मोरगाव येथे २२ हजार ५८४ पैकी ५३४४.९० हेक्टर, सडक-अर्जुनी येथे १७ हजार २२५ पैकी सहा हजार ९४६ हेक्टर व देवरी येथे १८ हजार ४९६ पैकी नऊ हजार ९३० हेक्टरमध्ये आतापर्यंत रोवणी करण्यात आली आहे. तसेच तुरीच्या सर्वसाधारण क्षेत्र सहा हजार ०४९ पैकी पाच हजार ९५० हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. (प्रतिनिधी)
चार तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस
जिल्ह्यातील आमगाव, गोरेगाव, सालेकसा व अर्जुनी-मोरगाव येथे आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडले. परंतु गोंदिया तालुक्यात सरासरीच्या ९२.० टक्के पाऊस झाले आहे. तिरोडा, देवरी व सडक-अर्जुनी येथे सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाले आहे. गोंदिया तालुक्यात जून महिन्यात सरासरीच्या केवळ २१.६ टक्के पाऊस झाले. आमगाव तालुक्यात जून महिन्यात ३८.७ टक्के, जुलै महिन्यात आतापर्यंत ७९.७ टक्के, गोरेगाव येथे जून महिन्यात ४६.६ टक्के व जुलैमध्ये आतापर्यंत ८८.२ टक्के, सालेकसा येथे जून महिन्यात ६१.६ टक्के, जुलैमध्ये आतापर्यंत ८१.९ टक्के, अर्जुनी-मोरगाव येथे जूनमध्ये ५३.८ टक्के, जुलैच्या आतापर्यंत ८५ टक्के पाऊस नोंदविण्यात आले आहे. तसेच तिरोडा येथे जूनमध्ये ६५.८ टक्के व जुलैच्या आतापर्यंत १५७.४ टक्के, देवरी येथे जूनमध्ये ६६.१ टक्के व जुलैच्या आतापर्यंत १३०.५ टक्के तसेच सडक-अर्जुनी येथे जूनमध्ये ५३.६ टक्के व जुलैच्या आतापर्यंत ११९.५ टक्के पाऊस नोंदविण्यात आले आहे.