राज्यापेक्षा जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर सरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST2021-02-05T07:44:53+5:302021-02-05T07:44:53+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात येण्याच्या मार्गावर आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९२.९० टक्के असल्याने जिल्ह्यात ...

राज्यापेक्षा जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर सरस
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात येण्याच्या मार्गावर आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९२.९० टक्के असल्याने जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ १२६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्याच्या कोरोना रिकव्हरी दरापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी दर अधिक असल्याने जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.
मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून नवीन रुग्णांचे प्रमाणसुद्धा बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आहे. सोमवारी जिल्ह्यात ८ कोरोना बाधितांची नोंद झाली तर ९ बाधितांनी कोरोनावर मात केली. सोमवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक सात रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत तर तिरोडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात ६५४९४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ५३८७९ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत ६५४२४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५९३१३ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४२०३ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १३८९५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १२६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.