ओबीसी सेवा संघाचे मार्चमध्ये जिल्हा अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:31 IST2021-02-09T04:31:33+5:302021-02-09T04:31:33+5:30
गोरेगाव : ओबीसी सेवा संघाची जिल्हास्तरीय बैठक येथील माॅडेल कान्व्हेंट व ज्यू. कॉलेजच्या सभागृहात घेण्यात आली. बैठकीत मार्च महिन्यात ...

ओबीसी सेवा संघाचे मार्चमध्ये जिल्हा अधिवेशन
गोरेगाव : ओबीसी सेवा संघाची जिल्हास्तरीय बैठक येथील माॅडेल कान्व्हेंट व ज्यू. कॉलेजच्या सभागृहात घेण्यात आली. बैठकीत मार्च महिन्यात तीन जिल्ह्यांच्या अधिवेशनाचा आढावा घेण्यात आला. सोबतच संघाच्या कार्यकारिणीचे गठन करण्यात आले.
संघाचे कार्याध्यक्ष सी. पी. बिसेन यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीला संघाचे प्रदेश सचिव सावन कटरे, जिल्हा संघटक डाॅ. गुरुदास येडेवार, जिल्हा सचिव डाॅ. प्रा. संजीव रहागंडाले, सडक-अर्जुनी तालुकाध्यक्ष भूमेश्वर चव्हाण, सेवानिवृत्त शिक्षक ही.धा.येळे, केंद्रप्रमुख आर.आर.अगडे, ओबीसी संघर्ष कृती समितीच्या महिला उपाध्यक्ष छाया चव्हाण, ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक खेमेंद्र कटरे, डाॅ. एल. एस. तुरकर, प्राचार्य डी. आर. कटरे, विनायक येडेवार, देवचंद बिसेन, पी. डी. चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी आंदोलनाच्या वाटचालींचा मागोवा घेण्यात आला. सोबतच ओबीसी सेवा संघ आणि ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहितीसह ओबीसी जनगणना व सत्ता संपत्तीत भागीदारीचा विचार गावागावांत रुजविण्याचे आवाहन पाहुण्यांनी केले. ओबीसी शेतकऱ्यांचा फक्त वापर करून घेणाऱ्या राजकीय-धार्मिक पक्ष संघटनांपासून सावध राहून संवैधानिक अधिकार मिळविण्यासाठी सामाजिक आंदोलनात योगदान देण्यासोबतच सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यात १९९८ पासून सुरू झालेल्या संघटनेच्या कामाचा व विद्ममान संघटेनाचा आढावा घेत गावपातळीवर जाऊन प्रत्येक गावात शाखा निर्माण करण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी ओबीसी सेवा संघाची तालुका शाखा पुनर्गठित करून शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी पुणे येथे होत असलेल्या ओबीसी सेवासंघाच्या ११व्या राज्य अधिवेशनाचे प्रक्षेपण बघण्यासोबतच सहभागी होण्यावर माहिती देण्यात आली. मार्च महिन्यात ओबीसी सेवासंघाचे तिसरे जिल्हा अधिवेशन घेण्याचे निश्चित करून २६ जून २०२१ रोजी जिल्ह्यातील ओबीसी चळवळीच्या द्विशतकीय वाटचालीनिमित्त एका कार्यक्रमाच्या आयोजनाच्या तयारी संदर्भात माहिती देण्यात आली. संचालन भूमेश ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक रामेश्वर बागडे यांनी मांडले. आभार हरिराम येरणे यांनी मानले.
----------------------
अशी आहे संघाची तालुका कार्यकारिणी
गठीत करण्यात आलेल्या तालुका कार्यकारिणीत अध्यक्षपदी आर. आर. अगडे, कार्याध्यक्षपदी रामेश्वर बागडे, उपाध्यक्ष पालिक वालके, जे. जे. पटले, महासचिव भूमेश ठाकरे, सचिव डाॅ. श्याम फाये, सहसचिव धिरज बघेले, संघटक नरेंद्र चौरागडे, राजकुमार पटले, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम साकुरे, प्रसिद्धीप्रमुख दीपक फाये, सुभाष बोपचे, संयोजक हरिराम येरणे, संपर्क प्रमुख अरुण चन्ने व मार्गदर्शकपदी प्रा. आर. डी. कटरे, डाॅ. एल. एस. तुरकर, ही. धा. येडे आदींची निवड करण्यात आली आहे.