कोरोनाबाधित कुटुंबांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST2021-06-09T04:36:31+5:302021-06-09T04:36:31+5:30

गोंदिया : तालुक्यात कोरोनामुळे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झालेल्या कुटुंबांना प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी रविवारी (दि. ६) ...

District Collector visits Corona affected families () | कोरोनाबाधित कुटुंबांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट ()

कोरोनाबाधित कुटुंबांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट ()

गोंदिया : तालुक्यात कोरोनामुळे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झालेल्या कुटुंबांना प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी रविवारी (दि. ६) सांत्वनपर भेट देऊन त्यांना मानसिक आधार दिला.

कोरोनामुळे परिवारातील प्रमुख कमावती व्यक्ती गमावल्यामुळे तसेच सामाजिक भीती निर्माण होऊन संबंधित परिवाराचे मानसिक खच्चीकरण झालेले असल्यामुळे प्रशासनातर्फे अशा परिवारांची भेट घेण्यात आली. यातून अशा परिवारांना मानसिक आधार मिळून इतर नागरिकांच्या मनात असलेली भीतीदेखील घालवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकारी खवले यांनी अशा परिस्थितीत कर्तापुरुष गमावलेल्या परिवारातील त्यांच्या विधवा महिलेला विशेष सहाय्य योजनेंतर्गत त्वरित लाभ मिळवून देण्याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. शासनाच्या विविध निकषांच्या अनुषंगानेदेखील संबंधित परिवारास लाभ देण्यात येईल, असे सांगण्यात आले. या भेटीदरम्यान संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवराज्याभिषेक दिनाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन वंदन करण्यात आले. संबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना त्यांच्या गावात कोरोना रोगाचा प्रसार कसा थांबविण्यात यावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याबाबत आवाहन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार आदेश डफळ, अप्पर तहसीलदार अनिल खडतकर, मंडळ अधिकारी एन. बी. वर्मा, अव्वल कारकून आशिष रामटेके, महसूल सहायक मुकुंद तिवारी उपस्थित होते.

Web Title: District Collector visits Corona affected families ()