शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या लढ्यासाठी जिल्हा बँकेचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने सर्वसंमत्तीने देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. कोरोना विरुध्द लढा देण्यासाठी संचालक मंडळाने ५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधी जमा करण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी सांगितले.

ठळक मुद्देसंचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग : मुख्यमंत्री सहायता निधीत आठ लाखांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुळे देशात मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. देश आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहेत. हा लढा आणखी बळकट करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. देशाप्रती असलेली आपली सामाजिक बांधलकी जपत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी सरकारला मदतीचा हात देत ८ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने सर्वसंमत्तीने देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. कोरोना विरुध्द लढा देण्यासाठी संचालक मंडळाने ५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधी जमा करण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी सांगितले.बँकेच्या संचालक मंडळापाठोपाठ बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन कोरोना विरुध्दचा लढा अधिक सक्षम करण्यासाठी देण्याचा निर्णय कर्मचारी संघटेनेचे अध्यक्ष सुनील कन्नमवार व सचिव किशोर यांनी घेतला असल्याचे बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश टेटे यांनी सांगितले.जिल्हा बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाच्या वेतनाचा ३ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार आहे.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून संकटकालीन परिस्थिती नेहमी धावून जाण्याचा परिचय दिला आहे.विशेष काही दिवसांपूर्वीच संचालक मंडळाने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यास तीन महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील ३६ हजारावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. संचालक मंडळ आणि कर्मचाºयांनी कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी दिलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.कोरोनामुळे देशात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. शासन आणि प्रशासन याविरुध्द सक्षमपणे लढा देत आहे. हा लढा अधिक सक्षमपणे लढता यावा, यासाठी बँकेच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी एकूण ८ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.- राजेंद्र जैनअध्यक्ष गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbankबँक