नागरिकांना चहा,पाणी व बिस्कट वाटप

By Admin | Updated: November 14, 2016 00:23 IST2016-11-14T00:23:22+5:302016-11-14T00:23:22+5:30

५०० व १००० रूपयांच्या नोटा बदलविण्यासाठी रविवारीही बँकांचे व्यवहार सुरूच होते.

Distribution of tea, water and biscuits to citizens | नागरिकांना चहा,पाणी व बिस्कट वाटप

नागरिकांना चहा,पाणी व बिस्कट वाटप

अर्जुनी-मोरगाव : ५०० व १००० रूपयांच्या नोटा बदलविण्यासाठी रविवारीही बँकांचे व्यवहार सुरूच होते. यामुळे शहरातील स्टेट बँक व एटीएमवर मोठ्या संख्येत नागरिकांची रांग लागली होती. बँक उघडण्यापूर्वी पासूनच लोकांनी रांग लावल्याचे दिसून येत होते व रांगेत तासनतास नागरिक ताटकळत उभे होते. अशात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून ही बाब लक्षात घेत येथील व्यवसायी श्याम चांडक व त्यांच्या यश आणि पियूष या दोन मुलांनी रांगेत उभ्या नागरिकांना रविवारी (दि.१३) ११ वाजतापासून चहा,पाणी व बिस्कीटांचे नि:शुल्क वाटप केले. चांडक परिवाराच्या या सेवाभावी कार्यात चहाटपरी चालक गणेश मेश्राम व संजय ताम्रकार यांनीही मदत केली. विशेष म्हणजे चहा व पाण्याचे जमा झालेले कप सुद्धा चांडक परिवारजणांनी उचलून परिसराची सफाई केली.

Web Title: Distribution of tea, water and biscuits to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.