शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शेतकरी गटांना रोवणी यंत्रांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत मानव विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील २२ शेतकरी कृषी गटांना ७५ टक्के अनुदानावर रोवणी यंत्राचे वाटप करण्यात आले. शेतीमध्ये यांत्रिकीपद्धतीचा वापर व्हावा. या हेतूने चालू हंगामात रोवणी यंत्राद्वारे जवळपास १०० एकर क्षेत्रामध्ये भात पिकाची रोवणी करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी ...

ठळक मुद्देरोवणीचा खर्च कमी : १०० एकरामध्ये धान रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत मानव विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील २२ शेतकरी कृषी गटांना ७५ टक्के अनुदानावर रोवणी यंत्राचे वाटप करण्यात आले. शेतीमध्ये यांत्रिकीपद्धतीचा वापर व्हावा. या हेतूने चालू हंगामात रोवणी यंत्राद्वारे जवळपास १०० एकर क्षेत्रामध्ये भात पिकाची रोवणी करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, आत्माचे तालुका समन्वयक विलास कोहाडे यांनी दिली.शेतीमधून विविध पिके घेण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च येतो. पारंपरिक पद्धतीला बगल देऊन तंत्रशुद्ध आधुनिक पद्धतीने पिकाची लागवड करुन जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळावा यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकºयांना कृषीविषयक मार्गदर्शन करुन प्रशिक्षण वर्ग घेतले जात आहे. शेतीमध्ये यंत्रांचा वापर होण्यासाठी शेतकºयांना सातत्याने प्रवृत्त केले जात आहे. मानव विकास योजनेंतर्गत तालुक्यातील सोमलपूर, चान्ना, बाक्टी, धाबेटेकडी, कान्होली, बुधेवाडा, वडेगाव-बंध्या, झाशीनगर, कवठा, सिलेझरी, गोठणगाव, महागाव, माहुरकुडा, बोंडगावदेवी या ठिकाणच्या २२ शेतकरी कृषी गटांना ७५ टक्के अनुदानावर रोवणी यंत्राचा पुरवठा करण्यात आला.रोवणी यंत्राचा वापर कसा करावा, यंत्राद्वारे रोवणीसाठी मॅटनर्सरी कशी तयार करावी याबाबतचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण कृषी अधिकारी कार्यालयाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, महिंद्रा कंपनीचे नितीन मेश्राम यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जावून दिले. सदर रोवणी यंत्राद्वारे भात पिकाची रोवणी केल्यास बियाण्यांची बचत होते. तसेच प्रती एकर रोवणीचा खर्च ६०० रुपये येतो. मनुष्य बळाने रोवणी केल्यास खर्चाचा प्रमाण जास्त असते. रोवणी यंत्राच्या वापराने २ हजार रुपयाची प्रति एकर बचत होते.तालुक्यात १०० एकरामध्ये रोवणी यंत्राद्वारे धानाची रोवणी करण्यात आली असून आजघडीला धानाची लागवड सुस्थितीत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. उत्पादन खर्च कमी येवून जास्त प्रमाणात फायदा होण्यासाठी शेतकºयांनी यांत्रिकीकरणाची कास धरावी, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.आधुनिकीकडे वाटचालग्रामीण भागात अलीकडे मजुरांची समस्या निर्माण झाली आहे. शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांची गैरसोत होत होती. त्यामुळे शेतकºयांनी यांत्रिकीकरणाची कास धरली. सध्या शेतकरी आधुनिकीकरणाकडे वळला आहे. शासनाकडूनही त्यांना मदत मिळत आहे.