शेतकरी गटांना रोवणी यंत्रांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:26 IST2017-09-01T21:26:06+5:302017-09-01T21:26:33+5:30

शेतकरी गटांना रोवणी यंत्रांचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत मानव विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील २२ शेतकरी कृषी गटांना ७५ टक्के अनुदानावर रोवणी यंत्राचे वाटप करण्यात आले. शेतीमध्ये यांत्रिकीपद्धतीचा वापर व्हावा. या हेतूने चालू हंगामात रोवणी यंत्राद्वारे जवळपास १०० एकर क्षेत्रामध्ये भात पिकाची रोवणी करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, आत्माचे तालुका समन्वयक विलास कोहाडे यांनी दिली.
शेतीमधून विविध पिके घेण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च येतो. पारंपरिक पद्धतीला बगल देऊन तंत्रशुद्ध आधुनिक पद्धतीने पिकाची लागवड करुन जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळावा यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकºयांना कृषीविषयक मार्गदर्शन करुन प्रशिक्षण वर्ग घेतले जात आहे. शेतीमध्ये यंत्रांचा वापर होण्यासाठी शेतकºयांना सातत्याने प्रवृत्त केले जात आहे. मानव विकास योजनेंतर्गत तालुक्यातील सोमलपूर, चान्ना, बाक्टी, धाबेटेकडी, कान्होली, बुधेवाडा, वडेगाव-बंध्या, झाशीनगर, कवठा, सिलेझरी, गोठणगाव, महागाव, माहुरकुडा, बोंडगावदेवी या ठिकाणच्या २२ शेतकरी कृषी गटांना ७५ टक्के अनुदानावर रोवणी यंत्राचा पुरवठा करण्यात आला.
रोवणी यंत्राचा वापर कसा करावा, यंत्राद्वारे रोवणीसाठी मॅटनर्सरी कशी तयार करावी याबाबतचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण कृषी अधिकारी कार्यालयाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, महिंद्रा कंपनीचे नितीन मेश्राम यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जावून दिले. सदर रोवणी यंत्राद्वारे भात पिकाची रोवणी केल्यास बियाण्यांची बचत होते. तसेच प्रती एकर रोवणीचा खर्च ६०० रुपये येतो. मनुष्य बळाने रोवणी केल्यास खर्चाचा प्रमाण जास्त असते. रोवणी यंत्राच्या वापराने २ हजार रुपयाची प्रति एकर बचत होते.
तालुक्यात १०० एकरामध्ये रोवणी यंत्राद्वारे धानाची रोवणी करण्यात आली असून आजघडीला धानाची लागवड सुस्थितीत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. उत्पादन खर्च कमी येवून जास्त प्रमाणात फायदा होण्यासाठी शेतकºयांनी यांत्रिकीकरणाची कास धरावी, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.
आधुनिकीकडे वाटचाल
ग्रामीण भागात अलीकडे मजुरांची समस्या निर्माण झाली आहे. शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांची गैरसोत होत होती. त्यामुळे शेतकºयांनी यांत्रिकीकरणाची कास धरली. सध्या शेतकरी आधुनिकीकरणाकडे वळला आहे. शासनाकडूनही त्यांना मदत मिळत आहे.