शिव मोक्षधाम सेवा समितीतर्फे रिक्षचालकांना साहित्य वाटप ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST2021-03-29T04:17:17+5:302021-03-29T04:17:17+5:30
विशेष म्हणजे, कोरोनामुळे रोजगारापासून वंचित असलेल्या रिक्षाचालकांना होळीनिमित्त जीवनोपयोगी वस्तूंची भेट देण्यात आल्या. तसेच पोलीस भरतीतीची तयार करीत असलेल्या ...

शिव मोक्षधाम सेवा समितीतर्फे रिक्षचालकांना साहित्य वाटप ()
विशेष म्हणजे, कोरोनामुळे रोजगारापासून वंचित असलेल्या रिक्षाचालकांना होळीनिमित्त जीवनोपयोगी वस्तूंची भेट देण्यात आल्या. तसेच पोलीस भरतीतीची तयार करीत असलेल्या नवयुवकांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप करून एक आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष रवी क्षिरसागर होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्ही. डी. मेश्राम, टेंभरे, मुन्नालाल येळे, राजू आंबेडारे, राणे, विजय मेश्राम, प्रवीण येवले, से.नि.सैनिक उमेश शेंडे, नारायण मेश्राम, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव संतोष कटकवार, राजेश देशमुख, संजय टिकेकर, समाज सेवक रामेश्वर श्यामकुवर, पत्रकार संघाचे सहसचिव राजीव फुंडे, मोतीलाल रहांगडाले, धीरज कुंभरे, अभय ब्राह्मणकर, शुभम भांडारकर, मनिष मोरे, अतुल मेश्राम, कमलेश डोये, अंकुश येटरे, संतोष बरईकर, महेश कनोजे, रामू गणपतराव, पन्नालाल बागडे, उपस्थित होते. संचालन समन्वयक भोला गुप्ता व महेश उके यांनी केले. आभार समितीचे सचिव राजेश सातूरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिव मोक्षधाम सेवा समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.