८५६ अपंगांना जीवनोपयोगी साहित्यांचे वाटप

By Admin | Updated: November 23, 2014 23:22 IST2014-11-23T23:22:04+5:302014-11-23T23:22:04+5:30

मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी, दिशा संस्था व एल्मिको तथा ओएनजीसीच्या माध्यमातून सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या जीवनोपयोगी साहीत्य

Distribution of lifelong literature to 856 persons with disabilities | ८५६ अपंगांना जीवनोपयोगी साहित्यांचे वाटप

८५६ अपंगांना जीवनोपयोगी साहित्यांचे वाटप

गोंदिया : मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी, दिशा संस्था व एल्मिको तथा ओएनजीसीच्या माध्यमातून सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या जीवनोपयोगी साहीत्य वाटप वैद्यकीय चाचणी शिबीरात पात्र ठरलेल्या ८५६ पात्र अपंगांना ८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात साहीत्य वाटप करण्यात येणार आहे.
माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी व दिशा संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षी दोन शिबीर घेण्यात आले. या दोन शिबिरात पात्र सुमारे चार हजार अपंगांना जीवनोपयोगी साहीत्य वाटप करण्यात आले. तर यंदा आॅयल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) व आटीर्फिशियल लिम्बस म्रन्युफॅक्चरंग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (एल्मिको) यांच्यावतीने १२ फेब्रुवारी रोजी अपंगांचे वैद्यकीय चाचणी शिबीर घेण्यात आले. यात एर हजार ३४ जणांची तपासणी करण्यात आली व त्यातील ८५६ अपंग जीवनोपयोगी साहीत्यासाठी पात्र ठरले.
या अपंगांना येत्या ८ डिसेंबर रोजी मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात साहीत्य वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हात-पाय नसलेल्या अपंगांना कृत्रिम हाय-पाय देण्यात येणार आहे. सोबतच ट्रायसिकल, व्हीलचेअर, कुबड्या, श्रवणयंत्र, अंधकाठी, मॉडीफाईड सी.पी.चेअर तसेच कृत्रिम अवयव, कॅलीपर आदींचे नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे. पात्र व्यक्तींनी आपल्या सोयीने शिबीरात वितरीत करण्यात येणारे साहीत्य सोबत घेऊन जाण्याची व्यवस्था करावी व नोंदणीच्या वेळी देण्यात आलेली पावती व ओळखपत्र सोबत आणाने अशी माहिती आमदार राजेंद्र जैन व दिशा संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवाशिष चॅटर्जी यांनी दिली.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Distribution of lifelong literature to 856 persons with disabilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.