पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्न धान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:26 IST2021-04-26T04:26:02+5:302021-04-26T04:26:02+5:30

अंत्योदय अन्न योजनेचा व प्राधान्य कुटुंबातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना १ महिन्याकरिता मोफत गहू व तांदूळ वाटप करण्याचा निर्णय ...

Distribution of free food grains to eligible beneficiaries | पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्न धान्याचे वाटप

पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्न धान्याचे वाटप

अंत्योदय अन्न योजनेचा व प्राधान्य कुटुंबातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना १ महिन्याकरिता मोफत गहू व तांदूळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णया अंतर्गत २ रुपये प्रति किलो गहू व ३ रुपये प्रति किलो तांदूळ या प्रमाणे अन्नधान्य खरेदी करीत असलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्यांना देय असलेले अन्न मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माहे एप्रिल व मे या कालावधीसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी माहे एप्रिलचे देय असलेले अन्नधान्य खरेदी केले नसेल त्या लाभार्थ्यांना योजनेंतर्गत शिधापत्रिकानुसार ३५ किलो अन्नधान्य व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांस प्रति व्यक्ती ५ किलो अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे. याबाबतचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने सर्व जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यामुळे लवकरच अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Distribution of free food grains to eligible beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.