अपंगांना कृत्रिम अवयव आणि साहित्यांचे वितरण

By Admin | Updated: June 10, 2015 00:47 IST2015-06-10T00:47:27+5:302015-06-10T00:47:27+5:30

सामाजिक न्याय विभाग, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ परभणी, ...

Distribution of artificial limbs and materials to disabled people | अपंगांना कृत्रिम अवयव आणि साहित्यांचे वितरण

अपंगांना कृत्रिम अवयव आणि साहित्यांचे वितरण

गोंदिया : सामाजिक न्याय विभाग, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ परभणी, समाजकल्याण विभाग जि.प. गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्वीकार स्पेशल एज्युकेशन सेंटर फॉर एम.आर. चिल्ड्रण स्कूल सिंगलटोली (गोंदिया) येथे जिल्ह्यातील अपंगांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वाटप करण्यात आले.
या वेळी नगरसेविका निर्मला दिलीप मिश्रा, माजी नगरसेवक रमेश कुरील, मिलिंद बांबोळे उपस्थित होते. कृत्रिम अवयव व साधनाच्या मदतीने सर्व प्रवर्गातील अपंगांना अपंगत्वावर मात करणे सहज शक्य होते. त्यासाठी सर्व अपंगांनी या योजनेचा लाभ घेवून कृत्रिम अवयव व साधनांचा नियमित वापर करावा, असे मत नगरसेविका मिश्रा यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी ५२ अपंगांना कृत्रिम अवयव व साधणे वाटप करण्यात आले. यात जयपूर फूट, कॅलीपर, कुबडी जोड, तीनचाकी सायकल, व्हीलचेयर, अंधकाठी, ब्रेलकीट, एम.आर. कीट, श्रवणयंत्र आदी साहित्यांचा समावेश आहे.
कार्यक्रमासाठी स्वीकार मतिमंद शाळेचे कर्मचारी मृणाल बांबोळे, भुवनेश्वर खडसे, उत्तम फुलझेले, प्रशांत वासनिक, प्रेमलता गिरीपुंजे, नितीन घरडे, शैलेश चौरसिया, चंद्रकला पंचभाई, भारती राऊत, कृष्णा शर्मा यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Distribution of artificial limbs and materials to disabled people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.