लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीसह इतर पाच सचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ५ मे पर्यंत लेखी स्पष्टीकरण तसेच आपली बाजू मांडावयाची असल्यास ८ मे रोजी दुपारी १ वाजता आवश्यक रेकॉर्ड, पुरावे व मुळ कागदपत्रांसह समक्ष हजर राहून लेखी जवाब सादर करण्याचे निर्देश गोंदियाचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संदीप जाधव यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.कृउबास समितीचे सभापती के.ए. कुरैशी, संचालक विलास गायकवाड, प्रमोद लांजेवार, व्यंकट खोब्रागडे, नुनतलाल सोनवाने व यशवंत कापगते यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. कुरेशी, गायकवाड व लांजेवार हे सहकारी संस्था गटातून निवडून कृउबा समितीवर आले आहेत. व्यंकट खोब्रागडे व नुतनलाल सोनवाने हे ग्रामपंचायत गटातून निवडून कृउबा समितीवर आले आहेत. तर यशवंत कापगते हे कोणत्याही क्षेत्रातून निवडून आलेले नसून ते सध्या गावातील पोलीस पाटील आहेत. हे संचालक ज्या संस्था गटातून निवडून आले. तेथील कालावधी संपुष्टात आला आहे. ते नंतरच्या निवडणुकीत त्या क्षेत्रातून निवडून आले नाहीत. तसेच त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य पदाचा राजीनामा दिलेला नाही. अशी तक्रार भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील दिपराज इलमकर यांनी ५ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधकाकडे केली.या तक्रारीच्या आधारावर जिल्हा उपनिबंधकांनी २४ एप्रिलला संबंधित संचालकांना नोटीस दिल्या आहेत. यासंदर्भात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सहा संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 21:21 IST
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीसह इतर पाच सचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ५ मे पर्यंत लेखी स्पष्टीकरण तसेच आपली बाजू मांडावयाची असल्यास ८ मे रोजी दुपारी १ वाजता आवश्यक रेकॉर्ड, .....
सहा संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार
ठळक मुद्दे५ मे पर्यंत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश