घरकुल बांधकामावरून वाद; काठीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:28 IST2021-05-14T04:28:19+5:302021-05-14T04:28:19+5:30

गोंदिया : देवरी पाेलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रेंगेपार (दल्ली) येथील कृष्णा अंताराम डोंगरवार (५७) यांच्या शेताच्या धुऱ्यावर घरकुलाचा खड्डा ...

Disputes over housing construction; Beating with a stick | घरकुल बांधकामावरून वाद; काठीने मारहाण

घरकुल बांधकामावरून वाद; काठीने मारहाण

गोंदिया : देवरी पाेलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रेंगेपार (दल्ली) येथील कृष्णा अंताराम डोंगरवार (५७) यांच्या शेताच्या धुऱ्यावर घरकुलाचा खड्डा करीत असताना त्यांनी मनाई केली असता आरोपीने त्यांना काठीने मारहाण केली. आरोपीने १० ते १२ वर्षांपूर्वी अतिक्रमण करून घर बांधले. आता त्या ठिकाणी घरकुलाचे बांधकाम करण्याकरिता कॉलमचे खड्डे खोदण्याकरिता चुन्याची आखणी कृष्णा डोंगरवार यांच्या शेताच्या धुऱ्यापर्यंत केली. ९ मे रोजी सकाळी १० वाजता कृष्णा यांनी चुन्याची आखणी का केलीस असे म्हटले असता आरोपीने त्यांना धक्काबुक्की करीत काठीने मारून जखमी केले. देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार तिरपुडे करीत आहेत.

Web Title: Disputes over housing construction; Beating with a stick