तिरोड्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयाला घाणीचा विळखा
By Admin | Updated: November 25, 2014 22:58 IST2014-11-25T22:58:54+5:302014-11-25T22:58:54+5:30
देशात सर्वत्र स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाळा व महाविद्यालयेच काय शासकीय कार्यालयसुद्धा या अभियानात सहभागी होत आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या हातात झाडू घेऊन

तिरोड्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयाला घाणीचा विळखा
तिरोडा : देशात सर्वत्र स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाळा व महाविद्यालयेच काय शासकीय कार्यालयसुद्धा या अभियानात सहभागी होत आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या हातात झाडू घेऊन आपले कार्यस्थळ स्वच्छ करीत असतानाच मात्र येथील स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालय यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की या कार्यालयात आजही घाण पसरली असून येथील कर्मचारी व येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना येथे श्वास घेण व वावरणे कठीण झाले आहे.
दुय्यम निबंधक कार्यालय हे शहराच्या मध्यभागी असून पोलीस स्थानक व डाक कार्यालय हे जवळच आहे. तिरोडा तालुक्यातही स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद लाभला आहे. तर वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांन केलेल्या कार्याची प्रशंसा देखील केली जात आहे. मात्र दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ््यात ही बाब कशी आली नाही असा प्रश्न येथे उपस्थित होते.
कारण, दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दाराच्या बाहेरील भागात दारुच्या बॉटल्स पडलेल्या असल्याचे दिसले. शिवाय कार्यालयातील मुत्रीघर व संडासही अत्यंत किळसवाण्या स्थितीत आहे. कित्येक दिवसांपासून त्यांची स्वच्छता करण्यात आले नसल्याचे येथी चित्र बघता स्पष्टपणे दिसून येते.
या कार्यालयामध्ये रजिस्ट्रीसाठी सर्वसामान्य लोकांना सायंकाळपर्यंत ताटकळत रहावे लागते. एवढ्या गचाळ वातावरणात श्वास घेणे कठीण असताना मात्र नाक दाबून येथील अधिकारी व कर्मचारीच काय तर नागरिक वावतरतात कसे असा प्रश्न केला जात आहे. तरिपण जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे.