शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

लोकन्यायालयातून वर्षभरात १४६१ प्रकरणांचा निपटारा

By admin | Updated: May 7, 2014 18:36 IST

गोंदिया न्यायालयावरील भार व ताण कमी करण्यासाठी लोकन्यायालयाच्या वतीने तडजोडीद्वारे विविध प्रकरणे सोडविली जातात.

 देवानंद शहारे 

गोंदिया न्यायालयावरील भार व ताण कमी करण्यासाठी लोकन्यायालयाच्या वतीने तडजोडीद्वारे विविध प्रकरणे सोडविली जातात. लोकन्यायालयाने वर्षभरात जिल्ह्यातील एकूण १४६१ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा केल्याची नोंद जिल्हा न्याय प्राधिकरणाने केली आहे. यात मोटारवाहन कायदा, प्राकरणात लेखा अधिनियम (चेक बाऊंस प्रकरणे), दिवानी व फौजदारीसह पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणांचा समावेश आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१३ या वर्षभराच्या कालावधीत लोकन्यायालयाने मोटार वाहन कायद्याची ९ प्रकरणे, चेक बाऊंसचे (एनआय अ‍ॅक्ट) २९ प्रकरणे, दिवानीचे ४८ प्रकरणे, फौजदारीचे ३३८ खटले व पूर्व न्यायप्रविष्ट १०३७ प्रकरणे अशा एकूण १४६१ प्रकरणांचा निपटारा तडजोडीने केला. त्यामुळे न्यायालयावरील ताण बर्‍याच प्रमाणात कमी झाला आहे.

यात गोंदिया तालुक्यातील मोटार अपघात कायद्याचे ९, चेक बाऊंसचे १०, दिवानीचे २५, फौजदारीचे ७६ व पूर्व न्यायप्रविष्ट १७५ अशा एकूण २९५ प्रकरणांचा समावेश आहे. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील चेक बाऊंसचा एक, दिवानीचे १०, फौजदारीचे ११० व पूर्व न्यायप्रविष्ट ५६ अशा एकूण १७७ प्रकरणांचा समावेश आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील फौजदारीचे १७ तर पूर्व न्यायप्रविष्ट ८६ अशा एकूण १०३ प्रकरणांचा समावेश आहे. देवरी तालुक्यातील दिवानीचा एक, फौजदारीचे १३ व पूर्व न्यायप्रविष्ट १२० अशा एकूण १३४ प्रकरणांचा समावेश आहे. आमगाव तालुक्यातील चेक बाऊंसचा एक, दिवानीचे ८, फौजदारीचे ३१ तर पूर्व न्यायप्रविष्ट ४३७ अशा एकूण ४७७ प्रकरणांचा समावेश आहे. तसेच तिरोडा तालुक्यातील चेक बाऊंसचे १७, दिवानीचे ४, फौजदारीचे ९१ व पूर्व न्यायप्रविष्ट १६३ अशा एकूण २७५ प्रकरणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सन २०१३ च्या जानेवारी, फेब्रुवारी, मे, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर व डिसेंबर महिन्यात लोकन्यायालयाचा कसलाही शेड्युल नव्हता. मार्च, एप्रिल, जून व नोव्हेंबर या केवल चार महिन्यातच लोकन्यायालयाने मोठ्या प्रमाणात विविध प्रकरणांचा निपटारा तडजोडीने केल्याची नोंद आहे. त्यातही वर्षभरातील केवळ दोनच महिन्यात सर्वाधिक प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. यात मार्च महिन्यात ६३७ व नोव्हेंबर महिन्यात सोडविण्यात आलेल्या ७४३ प्रकरणांचा समावेश आहे.

तालुका व महिनानिहाय सोडविलेली प्रकरणे गोंदिया, अर्जुनी/मोरगाव, सडक/अर्जुनी, देवरी, आमगाव व तिरोडा या तालुक्यातील मोटार अपघात कायद्याची, चेक बाऊंस, दिवाणी, फौजदारी व पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांचा महिन्यानिहाय केलेला निपटारा असा आहे. जानेवारी महिन्यात केवळ एक प्रकरण, मार्च महिन्यात एकूण ६३७ प्रकरणे, एप्रिल महिन्यात एकूण २६ प्रकरणे, जून महिन्यात २७ प्रकरणे, आॅगस्ट महिन्यात ५ प्रकरणे, सप्टेंबर महिन्यात एकूण १३ प्रकरणे, आॅक्टोबर महिन्यात एकूण ९ प्रकरणे व नोव्हेंबर महिन्यात एकूण ७४३ प्रकरणे अशा एकूण १४६१ प्रकरणांचा निपटारा वर्षभरात तडजोडीने करण्यात आला आहे. यात गोंदिया तालुक्यातील एकूण २९५, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील एकूण १७७, सडक/अर्जुनी तालुक्यातील १०३, देवरी तालुक्यातील १३४, आमगाव तालुक्यातील एकूण ४७७ व तिरोडा तालुक्यातील २७५ प्रकरणांचा समावेश आहे.

सोडविलेली ‘एक्स कॅडर’ कोर्ट प्रकरणे

लोकन्यायालयाने जिल्ह्यातील मोटार वाहन, चेक बाऊंस, दिवानी, फौजदारी व पूर्व न्यायप्रविष्ट अशा एकूण १४६१ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा तर केलाच, परंतु याशिवाय लेबर कोर्ट, असिस्टंट चॅरिटी कमिश्नर (सहायक धर्मदाय आयुक्त) व कंझुमर फोरमच्या प्रकरणांचीसुद्धा सन २०१३ मध्ये सोडवणूक केली. यात लेबर कोर्टची मार्च महिन्यातील ४ व नोव्हेंबर महिन्यातील २५ अशा एकूण २९ प्रकरणांचा निपटारा केला. सहायक धर्मदाय आयुक्त विभागाचे मार्च महिन्यातील १२० व नोव्हेंबर महिन्यातील ११३ अशा एकूण २३३ प्रकरणांचा निपटारा केला. शिवाय कंझुमर फोरमच्या नोव्हेंबर महिन्यातील दोन प्रकरणांचा निपटारा करण्यात आल्याची नोंद न्याय प्राधिकरणाने घेतली आहे.