गटशिक्षणाधिकाऱ्यांशी शिक्षक संघाची चर्चा

By Admin | Updated: October 1, 2014 23:25 IST2014-10-01T23:25:45+5:302014-10-01T23:25:45+5:30

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने उपसभापती चमनलाल बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांच्याशी तालुकाध्यक्ष अनिरुद्ध मेश्राम यांच्या

Discussion of teacher team with group officials | गटशिक्षणाधिकाऱ्यांशी शिक्षक संघाची चर्चा

गटशिक्षणाधिकाऱ्यांशी शिक्षक संघाची चर्चा

गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने उपसभापती चमनलाल बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांच्याशी तालुकाध्यक्ष अनिरुद्ध मेश्राम यांच्या नेतृत्वात पं.स. गोंदिया येथील प्राथमिक शिक्षकांच्या समस्येवर चर्चा करण्यात आली. त्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
पंचायत समिती गोंदियामध्ये १२ शिक्षक अतिरिक्त होते. त्यांचे जुलै २०१४ चे वेतन काढण्यात आले आहे. आॅगस्ट २०१४ चे वेतन जि.प. गोंदियाकडून राशी उपलब्ध झाल्यावर काढणार असे सांगण्यात आले. ४९ लाख रुपये आयकर म्हणून कपात झालेली रक्कम आयकर विभागाच्या शिक्षकांच्या पॅन नंबर मध्ये जमा झाली नाही. ज्या शिक्षकांच्या पॅन नंबरमध्ये जमा झाली नाही. ज्या शिक्षकांनी आॅनलाईनकरिता रक्कम दिली नाही. अशा शिक्षकांचे आयकर आॅन लाईन करीता सी.ए. भगवानी यांच्याशी संपर्क करुन हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
शालेय पोषण आहार राशी जून ते आॅगस्ट २०१४ जि.प. कडून उपलब्ध झाल्यावर देऊ, असे सांगितले. जि.पी. एफ मध्ये शिक्षकांचे नियमित हप्ते जमा झाले नाहीत. त्याकडे विशेष लक्ष देवून आॅक्टोंबर २०१४ चे वेतन व दिवाळी अग्रीम धन २३ आॅक्टोबर पुर्वी देण्याचे नियोजन केले आहे, असे सांगितले.
शिक्षकांचे विविध रजा प्रकरण त्वरीत काढण्यात येतील. चट्टोपाध्याय करीता यादी जि.प. गोंदिया येथे पाठविण्यात येईल, शिक्षण सेवकांचे ६ व्या वेतन आयोगाचे १ ते ४ हप्ते अजून जी.पी.एफ. खात्यात जमा झाले नाहीत ते त्वरित पाठविण्यात येणार आहेत.
चर्चेत तालुकाध्यक्ष अनिरुद्ध मेश्राम, सरचिटणीस गणेश चुटे, मोहन शहारे, नागसेन भालेराव, विनोद सूर्यवंशी, नानन बिसेन, यशोधरा सोनवाने, एम.आर. बोपचे, शामकुमार बिसेन, अजय चौरे, डी.एस. कोल्हे, मोरेश्वर बडवाईक, किशोर शहारे, चंद्रशेखर दमाहे, कृष्णा कापसे, सी.एस. सूर्यवंशी, नरेंद्र जे. कटरे, वाय.डी. पटले, आनंद मेश्राम, कैलास डुमरे, हेमंत पटले, के.के. पटले, जे.पी. कुरंजेकर, ओ.आय. रहांगडाले, दुर्गेश रहांगडाले, नरेंद्र आगाशे, मयूर राठोड, डालेश्वर बिसेन, बी.वाय. फुले, शामसुंदर सेलोकर, के.आर. मानकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Discussion of teacher team with group officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.