योजनांची माहिती देण्यासाठी चर्चासत्र
By Admin | Updated: September 24, 2014 23:37 IST2014-09-24T23:37:59+5:302014-09-24T23:37:59+5:30
तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने अतीदुर्गम, अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त भागात असलेल्या तालुक्यातील संपुर्ण गावात आरोग्य व स्वच्छता व आरोग्य विषयीच्या विविध योजनांची माहिती

योजनांची माहिती देण्यासाठी चर्चासत्र
सालेकसा : तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने अतीदुर्गम, अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त भागात असलेल्या तालुक्यातील संपुर्ण गावात आरोग्य व स्वच्छता व आरोग्य विषयीच्या विविध योजनांची माहिती देण्याच्या हेतुने चर्चासत्राचे आयोजन (दि. २५ ) गुरुवारला पंचायत समिती सभागृह सालेकसा येथे दुपारी १२ वाजता करण्यात आले आहे.
या चर्चासत्राला मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी. शिंदे, उपमुख्य कार्यकारी आधिकारी आर.एल. पुराम, डॉ. एच.एम. कळमकर, डॉ. रवी धकाते, डॉ. विनोद वाघमारे, डॉ.आर.डी. त्रिपाठी, डॉ. पाटील, तहसीलदार खापेकर, पोलीस निरिक्षक संदीप रणदीवे, व्ही.यु. पचारे उपस्थित राहणार आहेत.
चर्चासत्रासाठी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांची समन्वय सभा घेण्यात येणार आहे. या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. चर्चासत्रातून ग्रामस्वच्छता, आरोग्य विषयक माहिती, शासनाच्या विविध योजना व त्यांची अमलबजावणी कशा प्रकारे ग्राम स्तरावर करण्यात येतील, वैद्यकिय अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्याशी समन्वय कशाप्रकारे साधण्यात येईल, डेंग्यू, मलेरीया, साथरोग, कावीळ आजारावर माहिती देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)