भाजपच्या सभेत संघटन विषयक चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:01+5:302021-04-07T04:30:01+5:30
अध्यक्षस्थानी माजी सामाजिक न्यायमंत्री व माजी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. याप्रसंगी माजी सभापती दिलीप चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. ...

भाजपच्या सभेत संघटन विषयक चर्चा
अध्यक्षस्थानी माजी सामाजिक न्यायमंत्री व माजी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. याप्रसंगी माजी सभापती दिलीप चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन, तालुका महामंत्री सोनवाने, सलीम पठाण, महामंत्री भाजप युवा मोर्चा रवी पटले, गिरीश पारधी, सरपंच सुमेंद्र धमगाये, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद खान प्रामुख्याने उपस्थित होते. सभेत पक्षाच्या संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, ग्रुप ॲडमिन अशा प्रकारच्या समित्या स्थापन करून जोमाने पक्षाला बळकट करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी माजी उपसरपंच लाला फरदे, युनुस पठाण, सरफराज शेख व यशवंत सिंदीमेश्राम यांनी पक्षात प्रवेश केल्याने बडोले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. संचालन उपाध्यक्ष नामदेव नेवारे यांनी केले. आभार युवा भाजप सचिव मोरेश्वर चौधरी यांनी मानले.