प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST2021-08-23T04:31:24+5:302021-08-23T04:31:24+5:30

गोंदिया: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यांना निकालात काढण्यासाठी संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...

Discussion of many pending issues of primary teachers | प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्यांवर चर्चा

प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्यांवर चर्चा

गोंदिया: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यांना निकालात काढण्यासाठी संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ५ सप्टेंबर शिक्षक दिनापर्यंत समस्या निकालात न काढल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. शिक्षकांकडून प्रलंबित प्रकरणे संघटनेकडे येत असल्याचे जिल्हाध्यक्ष डी.टी.कावळे यांनी सांगितले. जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी यांनी तालुक्यातील प्रलंबित प्रकरणे सभेत मांडली.

यावेळी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यालयीन चिटणीस पदावर अरुण शिवणकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाची जिल्हा कार्यकारिणीची सभा जिल्हा सरचिटणीस एस.यू.वंजारी यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितच लाभ होणार आहे. शिक्षकांनी संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावे, संघटनेत स्वागतच केले जाईल, असे आवाहन एस.यू. वंजारी यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नेते आनंद पुंजे, नानन बिसेन, कीर्ती वंजारी, जितेंद्र डहाटे, के.एस. रहांगडाले, एच.एम. रहांगडाले, डी.डी. रिनाईत, वीरेंद्र भिवगडे, राजीव भरडे, अनिल वट्टी, राजू रहांगडाले, संतोष चित्रिव, किशोर शहारे, कृष्णा कापसे, अशोक तावाडे, एम.आर. ठाकरे उपस्थित होते.

Web Title: Discussion of many pending issues of primary teachers