शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST2021-03-06T04:27:56+5:302021-03-06T04:27:56+5:30
सालेकसा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...

शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा ()
सालेकसा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या चर्चेत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रश्न सविस्तर समजून घेतले व लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने कोविड-१९ अंतर्गत कार्यावर रुजू असलेल्या व मरण पावलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव पाठवावे, जीपीएफ बाबत लेखाविभागातून चालान व शेड्यूल बघून संघटनेला पावती दिली जाणार, १२ आणि २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव पाठविणे, उच्च परीक्षेला बसण्याची परवानगी मागितलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव पाठविणे, शाळा स्तरावरुन गोपनीय अहवालाच्या दोन प्रति मागविण्यात येतील व एक प्रत स्वाक्षरी करुन के. प्र. मार्फत शाळास्तरावर पाठविणे , मुळ व दुय्यम सेवापुस्तकाच्या नोंदी घेणे सुरुच असून जर शिक्षकांना अडचण येत असतील तर त्यांनी प्रत्यक्ष भेट घेणे, खाजगी कारणानिमित्ताची रजा प्रकरणे मंजूर करुन नियमित काढणे, खासगी रजा घेताना ७ दिवस आधी अर्ज करावे, शाळेचे बिल भरणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी प्रत्येक शिक्षकांनी जास्त लक्ष पुरवून शिष्यवृत्ती,नवोदय ह्या परीक्षांमध्ये जास्तीत जास्त बसवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ कसा मिळेल ह्या बाबींकडे विषेश लक्ष पुरविणे आदी विषय मांडण्यात आले. यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व विषयांवर लवकरात लवकर कारवाई करून ते निकाली काढण्याची ग्वाही दिली. चर्चेला संघाचे जिल्हा सरचिटणीस एस. यु. वंजारी, जिल्हा संपर्क प्रमुख अजय चौरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कृष्णा कापसे, तालुका नेते राजू रहांगडाले, तालुकाध्यक्ष अनिल वट्टी, तालुका सरचिटणीस अशोक तावाडे, डी.एम.दखने, एम.आर.ठाकरे, विजय चौधरी, एस.डी.राणे, शिवनकर, धुरेंद्र मच्छीरके, कुराहे, विजय उपवंशी, गिरीश अग्रवाल, उके, नंदू चित्रीव, एम. ओ. रहांगडाले, एस.बिसेन, एन.डी. कारंजेकर व इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.