राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विकास कामांवर चर्चा

By admin | Published: March 1, 2016 01:12 AM2016-03-01T01:12:59+5:302016-03-01T01:12:59+5:30

नेहरू सहकारी भात गिरणीच्या प्रांगणात झालेल्या तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात वडेगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

Discussion on Development works at NCP's Mela | राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विकास कामांवर चर्चा

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विकास कामांवर चर्चा

Next

वडेगाव : नेहरू सहकारी भात गिरणीच्या प्रांगणात झालेल्या तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात वडेगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ. दिलीप बन्सोड, जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, विणा बिसेन, सुनिता मडावी, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, प्रिती रामटेके, कैलाश पटले, प्रेम रहांगडाले, संभाजी ठाकरे, पं.स.सदस्या निता रहांगडाले उपस्थित होते. यावेळी वडेगाव जि.प.क्षेत्रातील विविध विकासकामे, समस्या याबाबत आढावा घेऊन पक्ष संघटनासंदर्भात चर्चा करण्यात आली. मेळाव्याचे प्रास्ताविक निता रहांगडाले, संचालन पूरणलाल टेंभरे तर आभार एम.एस.ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रवीण अंबुले, गजानन पटले, तिलक रहांगडाले, शैलेश सांगोळे, अनंतराम भेलावे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Discussion on Development works at NCP's Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.