लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेंतर्गत परिसरातील १४ गावे येत असून येथील शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी आदिवासी महामंडळाने आदिवासी विविध कार्यकारी संस्थेला प्राधिकृत केले आहे. परंतु धान खरेदी करताना स्थानिक शेतकऱ्यांचे धान सर्वप्रथम खरेदी करून अन्य गावांतील शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात भेदभाव केला जात असल्याचा आरोप केळवद येथील शेतीनिष्ठ शेतकरी दिनेश रहांगडाले पाटील यांनी केला आहे.येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेला शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील धान खरेदी करण्यासाठी प्राधिकृत केले आहे. या विविध कार्यकारी संस्थेंतर्गत केशोरी, कनेरी, केळवद, तुकुमनारायण, दकोटोला, डोंगरगाव, उमरपायली, वारव्ही, आंभोरा, चिसटोला, गवर्रा, गार्डनपूर, चिचोली-नवीन, चिचोली-जुनी अशा एकूण १४ गावांचा समावेश आहे.यासर्व गावांतील शेतकºयांचे धान खरेदी करावयाचे असताना सर्वप्रथम स्थानिक शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात आहे. तर इतर गावातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास हेतुपुरस्सर भेदभाव करून त्यांना डावलण्याचा सतत प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रहांगडाले यांनी केला आहे.धान खरेदी करण्याची पद्धत अनुक्रमनिहाय टोकन पद्धतीनुसार अंमलात आणून इतर गावांतील शेतकºयांना त्रास होणार नाही याची काळजी विविध कार्यकारी संस्थेने घेणे अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळे वेळीच आदिवासी महामंडळाने दखल घेवून विविध कार्यकारी संस्थेला प्रचलीत टोकन पद्धतीनुसार धान खरेदी करण्याचे निर्देश द्यावे, अन्यथा बाहेर गावातील शेतकरी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही रहांगडाले यांनी दिला आहे.धान खरेदी करताना इतर कोणत्याही गावातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात नसून टोकन पद्धतीनुसार आणि महामंडळाने दिलेल्या आदेशाप्रमाणे धान खरेदी केली जाते. शेतकरी एकाच वेळेस गर्दी करीत असल्याने थोडा विलंब होण्याची शक्यता असते.-विनोद बाबुराव गहाणेसंचालक, आदिवासी विविध कार्यकारी संस्था केशोरी
धान खरेदीत होत आहे भेदभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST
आदिवासी विविध कार्यकारी संस्थेला शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील धान खरेदी करण्यासाठी प्राधिकृत केले आहे. या विविध कार्यकारी संस्थेंतर्गत केशोरी, कनेरी, केळवद, तुकुमनारायण, दकोटोला, डोंगरगाव, उमरपायली, वारव्ही, आंभोरा, चिसटोला, गवर्रा, गार्डनपूर, चिचोली-नवीन, चिचोली-जुनी अशा एकूण १४ गावांचा समावेश आहे.
धान खरेदीत होत आहे भेदभाव
ठळक मुद्देआरोप : आदिवासी कार्यकारी संस्थेतील प्रकार