पाल्यांसाठी केली डिजीटल शाळा

By Admin | Updated: May 29, 2016 02:08 IST2016-05-29T02:08:17+5:302016-05-29T02:08:17+5:30

करंजी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पाल्यांसाठी त्यांच्या पालकांनी लोकसहभागातून डिजीटल शाळा तयार केली.

Digital school for boys | पाल्यांसाठी केली डिजीटल शाळा

पाल्यांसाठी केली डिजीटल शाळा

लोकसहभाग : करंजीच्या शाळेत घडणार स्मार्ट विद्यार्थी
कालीमाटी : करंजी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पाल्यांसाठी त्यांच्या पालकांनी लोकसहभागातून डिजीटल शाळा तयार केली.
पंचायत समिती आमगाव अंतर्गत जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा करंजी येथे लोकवर्गणी व शिक्षक पाल्यांच्या संयुक्त उपक्रमातून डिजीटल शाळेत रुपांतर करण्यात आले. उद्घाटन माजी आ. भेरसिंह नागपुरे याच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य सुरेश हर्षे, अतिथी म्हणून सहषराम कोरोटे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, पं.स. उपसभापती ओमप्रकाश मटाले, माजी पं.स. सभापती डॉ. गणेश हरिणखेडे, शिक्षण विस्तार अधिकारी डब्ल्यू.एस. छोबे, सी.बी. पाचोळे, सरपंच पंचफुला बागडे, हंसराज चुटे, प्रेमलाल लांजेवार, बुधराम लांजेवार, योगराज फुंडे, अनिरूध्द शेंडे, चंद्रसेन शेंड, श्रीराम शेंडे, घनश्याम बागडे, चैतराम हुकरे, रामेश्वर शेंडे, गणेश हुकरे, सिताराम तरोणे, गीता हुकरे, जयश्री लांजेवार उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत डिजीटल पध्दतीने व्हिडिओ क्लिप दाखवून करण्यात आले. यावेळी उल्हास नरड यांनी डिजीटल शाळा व विद्यार्थी आजची गरज या विषयी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.
हंसराज चुटे, बुधराम लांजेवार व गावकऱ्यांच्या प्रयत्नातून सुमारे १ लाख २५ हजार रुपये वर्गणी गोळा करून डिजीटल शाळेची स्वप्नपूर्ती केल्याचे सांगण्यात आले. संचालन आर.सी. बिसेन तर आभार मुख्याध्यापक एस.जी. बिसेन यांनी मानले.
यशस्वीतेसाठी डब्ल्यू.के. शेंडे, व्ही.एल. महारवाडे, एन.जी. कातकडे, एस.एम. कुंभरे, एन.जी. मेश्राम, एल. एम. कोल्हे, महेंद्र खोब्रागडे, बाळकृष्ण फुंडे, रामचंद वंजारी यांनी सहकार्य केले.
(वार्ताहर)

Web Title: Digital school for boys