Corona Virus in Gondia; कोरोनाशी दोन हात 'असेही'; गोंदियातील ग्रामस्थांच्या आगळ्यावेगळ्या श्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 06:00 PM2020-04-06T18:00:03+5:302020-04-06T18:09:53+5:30

कोरोनाशी अवघे जग वैज्ञानिक पद्धतीने टक्कर देत असताना, गोंदिया जिल्ह्यातल्या लहानलहान खेडेगावांमधले नागरिक मात्र 'त्यांच्या' पद्धतीने कोरोनाला हरवण्यासाठी झटत आहेत.

The Different way of fight with corona; villagers applying in Gondia district | Corona Virus in Gondia; कोरोनाशी दोन हात 'असेही'; गोंदियातील ग्रामस्थांच्या आगळ्यावेगळ्या श्रद्धा

Corona Virus in Gondia; कोरोनाशी दोन हात 'असेही'; गोंदियातील ग्रामस्थांच्या आगळ्यावेगळ्या श्रद्धा

Next
ठळक मुद्देविश्वास व अविश्वासाच्या दरम्यानचे गूढ

दिलीप चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: कोरोनाशी अवघे जग वैज्ञानिक पद्धतीने टक्कर देत असताना, गोंदिया जिल्ह्यातल्या लहानलहान खेडेगावांमधले नागरिक मात्र 'त्यांच्या' पद्धतीने कोरोनाला हरवण्यासाठी झटत आहेत.
इथे कोणाला क्वारंटाईन व्हावे लागत नाही की, तोंडाला मास्क लावून बसावे लागत नाही. इथे काही वेगळेच केले जात आहे.
गोंदिया जिल्हा हा मध्यप्रदेशच्या बालाघाटला लागूनच आहे. याच सीमेवर, गोरेगाव तालुक्यात असलेल्या गौरीतुला येथे राहत असलेल्या एका स्त्रीला स्वप्न पडले की, पाटा व वरवंटा यांची पूजा करा, मग तुम्हाला कोरोना होणार नाही अशा आशयाचे. तिने ते जवळपासच्या लोकांना सांगितले. यात पाटा हा दक्षिण उत्तर दिशेने पालथा ठेवून त्याला फुले वहायची होती. तिथे दिवाही पेटवायचा होता. मग वरवंटा त्या पाट्यावर उभा ठेवायचा होता. आपण सारे जाणतोच, की वरवंटाच्या दोन्ही बाजू या गोलाकार असतात. असा हा गोलाकार असलेला भाग पाट्यावर उभा करणे अशक्य असताना तसे घडत असल्याचे गावकऱ्यांनी अनुभवले व त्यांचा या कृतीवर विश्वास बसला आणि ही वार्ता वाºयासारखी इतर गावांमध्येही पसरली आणि तिथेही पूजा सुरू झाली. पाटा वरवंटा पूजा असे त्याचे नामकरणही झाले. ही पूजा सध्याही गावोगावी केली जाते आहे. गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव, गौरीटोला, गोदिया तालुक्यात सावरी, तिरोडा तालुक्यात चांदोरी, बालाघाट जिल्हातील बांदरी भोपाल येथे पाटावरवंटा उभा करण्याचा प्रयोग करण्यात आले व त्याची पूजा करण्यात आली. सदर प्रयोग उत्तर-दक्षिण दिशेला बसून पाट्याच्या दोन्ही दिशेला दिवे लावून भगवान महादेव चे नाव घेत करण्यात आला. विशेष म्हणजे घरातील प्रत्येकानी वरवंटा उभा करण्याचा प्रयत्न केला पण सर्वांना उभा करता आला नाही. 

 सध्या गोंदियात एक कोरोनाबाधित रुग्ण असून ७६ जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवलेले आहे. 
 

 


याच दरम्यान अजून एक वेगळा उपचार तेथे केला जाऊ लागल्याचे वृत्त आहे. घरोघरी असलेल्या तुळशी वृंदावनात तुळशीच्या रोपट्याखाली कोळसा सापडतो अशी चर्चा गावात सुरू झाली. या कोळशाला पाण्यात ठेवून ते पाणी घोटभर प्यायल्यास कोरोना होत नाही. त्या पाण्याचा शिडकाव घरभर केल्यास घर सुरक्षित राहते आणि त्या कोळशाचा टिळा कपाळी लावल्यास कोरोना होत नाही असाही एक विश्वास येथील गावकऱ्यांमध्ये अलीकडे दिसतो आहे. टिळा लावलेले गावकरी येथे पहावयास मिळत आहेत.
या कृतींना श्रद्धा म्हणावे की अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोरोनाशी दोन हात करताना, तिथे 'ती' कृती फक्त प्रयत्न एवढीच म्हणून शिल्लक उरते एवढेच.

 

Web Title: The Different way of fight with corona; villagers applying in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.