लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गालफुगी हा मुलांमधील संसर्गजन्य आजार आहे. याला गालगुंड असेही म्हणतात. लहान मुलांमध्ये पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे पावसाळा किंवा उन्हाळा हे ऋतू सुरू होताना या आजाराचा त्रास होतो.
थंडी-ताप, डोकेदुखी अन् भूक मंदावतेपॅरोटीड ग्रंथीला सूज येत असल्याने कान दुखणे, पोटात दुखणे, स्नायू, सांधे दुखणे, मळमळ, तसेच भूक न लागणे ही लक्षणे दिसतात.
घाबरू नका, काळजी घ्यालहान मुलांमध्ये याबाबत वारंवार त्रास जाणवत असला तरी याबाबत योग्य वैद्यकीय सल्ला आवश्यक असतो. पालकांनाही आपल्या मुलांना होणाऱ्या त्रासामुळे घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी. गालगुंडमध्ये घाबरून जाण्याचे कोणतेच कारण नाही. कारण योग्य उपचाराने तो बरा होतो. तोपर्यंत काळजी घ्यावी त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही.
विषाणूजन्य आजार; खोकला, लाळेतून पसरतोगालगुंड हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे ज्यांना लक्षणे आहेत त्यांच्यापासून दूर राहावे. खोकला, लाळेतून हा आजार पसरतो. तसेच लक्षणे आढळल्यास बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
लाळग्रंथी सुजते, गाल फुगून हनुवटी दुखतेसुरुवातीला जबड्याच्या अँकलला सूज येते. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसतात. लाळग्रंथी सूजते, गाल फुगून हनुवटी दुखते. काहीवेळा डोकेदुखी, सांध्यातील वेदना, तोंड कोरडे पडणे.
मुलांना 'एमएमआर' लस देणे आवश्यकया आजारापासून दूर राहण्यासाठी बाळ ९ महिन्यांचे झाल्यानंतर त्याला एमएमआरचा पहिला डोस आणि त्यानंतर सहा महिन्यांनी दुसरा डोस द्यावा लागतो.
गालगुंड हा संसर्गजन्य आजारगालफुगी किंवा गालगुंड हा आजार संसर्गजन्य असल्याने विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी हातांची स्वच्छता तसेच उपचार, लस घ्यावी लागते. हा आजार होऊ नये, यासाठी इतर मुलांना दूर ठेवणे गरजेचे असते.
गालगुंड झाल्यास काय कराल?
- गालगुंडपासून बचाव करण्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे.
- हार्मोन थायरॉइड हार्मोनसाठी आयोडिन गरजेचे आहे. अशावेळी आहारात आयोडिनयुक्त भोजनाचा समावेश करायला हवा.
- उदा. मासे, सफरचंदाचा ज्यूस, ३ वाटाणे, दूध, दही, अंडी, चीज, केळी, वाळलेला बटाटा, कॉर्न आदीचा समावेश हवा.