वित्त व लेखा विभागाच्या उदासीनतेमुळे शिक्षकांची दिवाळी अंधारात?
By Admin | Updated: October 18, 2014 01:41 IST2014-10-18T01:41:25+5:302014-10-18T01:41:25+5:30
आॅक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण असल्यामुळे दिवाळीपूर्वी म्हणजे २० तारखेपर्यंत आॅक्टोबरचे वेतन देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता.

वित्त व लेखा विभागाच्या उदासीनतेमुळे शिक्षकांची दिवाळी अंधारात?
गोंदिया : आॅक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण असल्यामुळे दिवाळीपूर्वी म्हणजे २० तारखेपर्यंत आॅक्टोबरचे वेतन देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. मात्र अद्याप आॅक्टोबर महिन्याचे बिल मुख्य कोषागार कार्यालयात गेले नाही. याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच उपाध्यक्ष किशोर डोंगरवार व जिल्हा संघटक सुरेश रहांगडाले यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (दि.१७) वित्त व लेखा अधिकाऱ्यांशी वेतनासंबधी चर्चा करण्यात आली.
दिवाळी सण अग्रीमचे बील हे स्वतंत्ररित्या सादर करावयाचे होते.परंतु प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयाच्या वतीने नियमित वेतनासोबत अग्रीम बिल घालण्याची सूचना मिळाल्यामुळे सण अग्रीमही दिवाळीपूर्वी मिळणार किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. आॅक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी करण्यात यावे असे कोणतेही शासन पत्रक नसल्यामुळे वेतन देण्यास मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी असमर्थता दर्शविली आहे.
यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोणताही मुख्य सण २० तारखेनंतर आल्यास वेतन २० तारखेपर्यंत देण्यात यावे असा शासन आदेश असून त्याच आदेशानुसार वेतन देण्याचा आग्रही केला आहे. त्यावर मुख्य वित्त व लेखा अधिकारी राम चव्हाण यांनी वित्त मंत्रालय मुंबई येथे दूरध्वनीवरून संपर्क साधला. शासनाकडून योग्य निर्देश मिळताच अतिशिघ्र कार्यवाही करून आॅक्टोबरचे वेतन व दिवाळी पूर्वी सण अग्रीम देण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.
दिवाळीपूर्वी आॅक्टोबरचे वेतन व सण अग्रीम देण्यात न आल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक समिती गोंदियाच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने कित्येकवेळा शिक्षकांच्या वेतनासाठी प्रशासनाची वाद घातला. उपोषणे, आंदोलने करण्यात आले. शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी शिक्षक समिती रस्त्यावर उतरली. शिक्षकांचे विविध प्रश्न, वेतनाची समस्या, चट्टोपाध्याय वेतनश्रेणी, पदोन्नती अश्या विविध समस्यांना योग्यरित्या हाताळले आहे.सदर शिष्टमंडळात किशोर डोंगरवार, सुरेश रहांगडाले, संदीप तिडके, बेनीराम भानारकर, नीलकंठ बिसेन, सतीश दमाहे, दिलीप लोधी, विठ्ठल सोनवाने, नरेश बडवाईक, विलास डोंगरे, संजु बोपचे, गजानन पाटणकर, राजू बोपचे चिरवतकर, आर.जी. शहारे, वरूण दिप, दिलीप नवखरे, परमदास सर्याम, गोवर्धन लंजे, ओ.जे. वासनिक, अनिल टेंभुर्णीकर, पी.एन.बडोले, जी.आर.गायकवाड, नरेश मेश्राम व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)