महिला दिनी सर्व्हायकल कॅन्सरची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST2021-03-10T04:30:06+5:302021-03-10T04:30:06+5:30
याअंतर्गत पॅप स्मीअर ही तपासणी करून पथोलॉजी लॅब मध्ये कॅन्सरच्या कोशिकांची तपासणी करून कर्करोगाचे निदान करण्यात येते. दरवर्षी सुमारे ...

महिला दिनी सर्व्हायकल कॅन्सरची तपासणी
याअंतर्गत पॅप स्मीअर ही तपासणी करून पथोलॉजी लॅब मध्ये कॅन्सरच्या कोशिकांची तपासणी करून कर्करोगाचे निदान करण्यात येते.
दरवर्षी सुमारे ७७,३४८ महिलांचा मृत्यू या कॅन्सरने होतो. जागतिक महिला दिनानिमित्त
३५ वर्षांवरील सर्व महिलांनी ही तपासणी वर्षातून एकदा तरी करून घ्यावी, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. याप्रसंगी संस्था अध्यक्ष डॉ. मेघा रत्नपारखी, सचिव डॉक्टर शिल्पा मेश्राम, आयएमए अध्यक्ष डॉ. प्रणिता चिटणवीस यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांना भेटून या कॅन्सरची लस शासकीय लसीकरण कार्यक्रमात सहभागी करावी, असे निवेदन केले आहे. ही लस १० ते १२ वर्षांच्या मुलींपासून २५ वर्षांच्या स्त्रियांसाठी उपयुक्त आहे. ही लस या कॅन्सरपासून ८०-९० टक्के संरक्षण देते. यापुढेही या तपासणीचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.