धामणगाव तंटामुक्त समितीने घडविले प्रेमीयुगलाचे शुभमंगल
By Admin | Updated: September 29, 2016 00:23 IST2016-09-29T00:23:54+5:302016-09-29T00:23:54+5:30
धामणगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने प्रेमी युगलाचे शुभमंगल घडवून आणले.

धामणगाव तंटामुक्त समितीने घडविले प्रेमीयुगलाचे शुभमंगल
गोंदिया : धामणगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने प्रेमी युगलाचे शुभमंगल घडवून आणले. एकाच गावात राहणाऱ्या त्या तरूण-तरूणीचे एकमेकांवर प्रेम जडले. परंतु मुलींच्या आई-वडीलाचा या लग्नाला विरोध होता. परंतु त्याच्या विरोधाला न जुमानता या युगुलाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे धाव घेतली.
याचे शुभमंगल नागरिकांच्या साक्षीने करण्यात आले. कारूलाल रामा बाहे (२६) व निशा चैनलाल पाचे (१८) असे विवाह बंधनात अडकलेल्या युगुलांची नावे आहेत. सरपंच इंदू गजभिये, उपसरपंच हरिप्रसाद मरठे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजु खरे, पोलीस पाटील वामनराव वाहाने, गांधीराज पारधी, माणिकचंद रहांगडाले डागेलाल बाहे, आनंद वासनिक, कुवरलाल टेंभरे, शामराज कावरे, अशोक डहाट, तिर्थराज डहाट, विद्या मेश्राम, शांता रामटेके, कारण मेश्राम यांनी सदर शुभमंगल घडवून आणला. (तालुका प्रतिनिधी)