‘दम लगाके हईशा’ उत्साहात
By Admin | Updated: May 16, 2017 01:01 IST2017-05-16T01:01:27+5:302017-05-16T01:01:27+5:30
लोकमत सखी मंच, बालविकास मंच व असाटी मृणाल कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्तवतीने मातृ दिनाचे औचित्य ....

‘दम लगाके हईशा’ उत्साहात
लोकमत सखी मंच, बालविकास विकास मंच : मृणाल कोचिंग क्लासेसचा संयुक्त उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकमत सखी मंच, बालविकास मंच व असाटी मृणाल कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्तवतीने मातृ दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.१४) येथील आंबेडकर चौकात ‘दम लगाके हईशा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एखादी स्त्री जेव्हा बाळास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या बाळाची आई बनते. मराठी भाषेतला ‘आई’ हा शब्द मानवीय भावनाशी निगडीत असून त्यास मानसाच्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे.
स्त्री ने जन्म दिला नसतांनाही ती सवतीच्या मुलाची किंवा दत्तक मुलाची आई बनते. हाच हेतू स्पष्ट करण्याचा उद्देश समोर ठेवून आयोजकांच्यावतीने आयोजित ‘दम लगाके हईशा’ कार्यक्रमातून आईची भूमीका साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
‘दम लगाके हईशा’ मध्ये आईने आपल्या बाळाला पाठीवर घेऊन दिलेले अंतर सर करण्याची धाव स्पर्धा ठेवण्यात आली होती. यात शहरातील विविध भागातून आलेल्या स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेला आई-वडीलांसोबत बालक त्याचप्रमाणे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्ष अशोक इंगळे, वाहतूक विभागाचे श्रीकांत डोंगरे पाटील, प्रा. विमल असाटी, बापू युवा संगठनचे योगेश अग्रवाल, जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, जिल्हा संयोजिका दिव्या भगत (पारधी), डॉ. आकाश सोनकनेऊर उपस्थित होते.
स्पर्धेत योगिता बिसेन-वेदी बिसेन, शारदा रितपूरकर-दिव्यानी रितपूरकर, किरण सूर्यवंशी-अनमोल, विमोल सूर्यवंशी, अपर्णा बालकोटे-जानवी बालकोटे, आरती यादव-पार्थ यादव, सुनीता नागपुरे-सीया नागपुरे, रविकांता नागपुरे-अंकेश नागपुरे, माधुरी मैंद-रुबल मैंद, अर्चना चौरेवार-तुषार चौरेवार, प्रिती शर्मा-करण शर्मा, स्वाती बदमे-क्रिश बदमे, रागिनी वासनिक-कनिष्ठ वासनिक, सपना तिवारी -कुश तिवारी, दिपीका पांडे-अभिनव पांडे, ज्योती चौधरी-तुषीत चौधरी आदिंनी भाग घेतला होता.
या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना रोख बक्षिस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. संचालन दिव्या भगत (पारधी) यांनी केले. आभार श्रीकांत पिल्लेवार यांनी केले.
मातृदिनाच्या दिवसाची सुरुवातच फार छान होत आहे. यामुळे मातांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक वेगळी शुभेच्छा आयोजकांनी दिली आहे. आईची माया कुणापासून ही वेगळी नाही. यामुळे आईला एकच दिवस आदरांजली न देता सारे आयुष्य आईच्या नावावर असू द्या.
अशोक इंगळे
अध्यक्ष, नगर परिषद, गोंदिया
आईचे प्रेम आणि तिचा प्रेमळ स्वभाव सर्वांनाच अनुभवायला मिळतो आणि यासारखा मायाळूपणा दुसरा कुणीच देऊ शकत नाही. म्हणून आईचे महत्व आपल्या जीवनात सर्वांनाच माहिती असते.
श्रीकांत डोंगरे पाटील
निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया
आई हा शब्द प्रत्येकांच्या जीवनात न चुकता येतोच. कधी प्रेम तर कधी राग या दोघांतून आईची ममता दिसून येते. अशा स्वभावानेच तिला ‘माझी-माय’ असे संबोधले जाते.
विमल असाटी
प्राध्यापक
मदर्स डे फक्त एकच दिवस साजरा न करता वर्षातील ३६५ दिवस साजरा व्हावा. आईचे प्रेम सम्मानाचा मार्ग दाखवित आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाते.
योगेश अग्रवाल
अध्यक्ष, बापू युवा संघटन