ग्रामीण परिसरात होणार ३५ कोटींची विकास कामे
By Admin | Updated: March 18, 2016 02:05 IST2016-03-18T02:05:43+5:302016-03-18T02:05:43+5:30
गोंदिया तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने कामठा-बिरसोला जि.प. क्षेत्र व पांजरा-काटी पंचायत समिती क्षेत्रांतर्गत काँग्रेस ..

ग्रामीण परिसरात होणार ३५ कोटींची विकास कामे
गोंदिया : गोंदिया तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने कामठा-बिरसोला जि.प. क्षेत्र व पांजरा-काटी पंचायत समिती क्षेत्रांतर्गत काँग्रेस कार्यकर्तांची विशेष सभा आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मार्गदर्शन करताना अग्रवाल यांनी आज राज्यात विरोधकांची सत्ता असली तरी गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाकरिता आपले प्रयत्न सुरु असून चालू वित्तीय वर्षात ३५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा ग्रामीण परिसरात शुभारंभ करणार असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना आ.अग्रवाल म्हणाले की, कामठा-नवरगाव येथे २ कोटी रुपये किमतीचा पूल, खातीया-बटाना येणारे महत्वपूर्ण बंधारे एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे कामठा ते खातीया मार्ग चौडीकरणकरिता २ कोटी रुपये, खातीया पाणघाटकरिता २७ लक्ष रुपये, रावणवाडी ते गर्रापर्यंत निर्माण कार्य, ३ कोटी रुपये किमतीचे दलित वस्ती योजनेअंतर्गत कामांना पालकमंत्री तथा लेखाशिर्ष योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली आहे.
अर्जुनी-चारगाव-बटाना मार्गाचे निर्माण कार्य, त्याचप्रमाणे ग्रामीण परिसरातील स्मशान शेड, ग्राम पंचायत भवन, अंगणवाडीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. कामठा-सावरी-अर्जुनी पर्यंतचा उर्वरित मार्गही लवकरच पूर्ण होणार आहे. अशी अनेक विकास कामे ३५ कोटी रुपयांतून करण्यात येणार आहेत. अनेक कामांचा प्रारंभ झाला असून उर्वरित कामे लवकरच प्रारंभ होणार आहेत. यामुळे ग्रामीण युवकांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे ते म्हणाले. या सभेचे संचालन काँग्रेसचे महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले.