शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

परिसरातील प्रत्येक गावापर्यंत विकास कार्य पोहोचविले

By admin | Updated: September 22, 2014 23:21 IST

जून २०१५ पासून गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल व हे महाविद्यालय पूर्णपणे कार्यरत होईल. प्रत्येक गावापर्यंत आम्ही विकास कार्य पोहचविले आहेत.

अग्रवाल यांचे प्रतिपादन : ग्रा.पं. सदस्यांच्या संमेलनाची सांगतागोंदिया : जून २०१५ पासून गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल व हे महाविद्यालय पूर्णपणे कार्यरत होईल. प्रत्येक गावापर्यंत आम्ही विकास कार्य पोहचविले आहेत. झालेले विकास कार्य आपण सर्वांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले. जिल्हा काँग्रेसद्वारे ग्रामपंचायत सदस्यांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गेल्या १० वर्षांत ग्रामपंचायतींना अधिकाधिक शक्ती देण्याचे काम महाराष्ट्र शासनाने केले आहे. गोंदिया तालुक्यात लोकशाहीचे प्रथम पायदान असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीपासून ते गावातील प्रत्येक विषयासाठी आम्ही मदत केली आहे. गोंदिया तालुक्याच्या विकासासाठी मी एक मास्टर प्लॉन तयार केलेला आहे. देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेचे बांधकाम सुरू करण्यात येत आहे. वाघ नदीवर ५०० कोटींच्या खर्चाने मोठे बांध तयार करून तालुक्यातील सिंचन व्यवस्थेत वाढ करण्याचे आमचे लक्ष्य आहे. रोजगारोन्मुख शिक्षण देण्यासाठी शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज, नर्सिंग कॉलेज उघडले आहेत. संघर्ष करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणण्याचा आमचा उद्देश लवकरच पूर्ण होत आहे. त्यासाठी २५ एकर जमीन कुडवा येथे मिळवून दिली. तसेच कॉलेज चालविण्यासाठी शासनाने डीन म्हणून डॉ. केवलिया यांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी ५०० पदांची निर्मिती करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश रहमतकर यांनी आ.गोपालदास अग्रवाल यांच्या विकास कार्यांवर प्रकाश टाकला. सभेत जि.प. सदस्य रमेशकुमार लिल्हारे, रूद्रसेन खांडेकर, अर्जुनी नागपुरे, मुनेंद्र नांदगाये, पं.स. सभापती सरिता अंबुले, उपसभपती चमन बिसेन, कौशल्य बोपचे, लोकचंद दंदरे, मनिष मेश्राम, फत्तेचंद शेंडे, लक्ष्मी रहांगडाले, विद्या भालाधरे, रामेश्वर हरिणखेडे, दिगंबर बघेले आदींनी संबोधित केले. कार्यक्रमात प्रामुख्याने जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, कृउबासचे उपसभापती धनलाल ठाकरे, संचालक अरूणकुमार दुबे, विठोबा लिल्हारे, आशिषसिंह नागपुरे, जगदीश अग्रवाल, खेमन बिरनवार, सावलराम महारवाडे, आशिष चव्हाण, गेंदलाल शरणागत, छन्नू खरकाटे, सत्यम बहेकार तसेच तालुक्यातीलल सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)