परिसरातील प्रत्येक गावापर्यंत विकास कार्य पोहोचविले
By Admin | Updated: September 22, 2014 23:21 IST2014-09-22T23:21:49+5:302014-09-22T23:21:49+5:30
जून २०१५ पासून गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल व हे महाविद्यालय पूर्णपणे कार्यरत होईल. प्रत्येक गावापर्यंत आम्ही विकास कार्य पोहचविले आहेत.

परिसरातील प्रत्येक गावापर्यंत विकास कार्य पोहोचविले
अग्रवाल यांचे प्रतिपादन : ग्रा.पं. सदस्यांच्या संमेलनाची सांगता
गोंदिया : जून २०१५ पासून गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल व हे महाविद्यालय पूर्णपणे कार्यरत होईल. प्रत्येक गावापर्यंत आम्ही विकास कार्य पोहचविले आहेत. झालेले विकास कार्य आपण सर्वांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.
जिल्हा काँग्रेसद्वारे ग्रामपंचायत सदस्यांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, गेल्या १० वर्षांत ग्रामपंचायतींना अधिकाधिक शक्ती देण्याचे काम महाराष्ट्र शासनाने केले आहे. गोंदिया तालुक्यात लोकशाहीचे प्रथम पायदान असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीपासून ते गावातील प्रत्येक विषयासाठी आम्ही मदत केली आहे. गोंदिया तालुक्याच्या विकासासाठी मी एक मास्टर प्लॉन तयार केलेला आहे. देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेचे बांधकाम सुरू करण्यात येत आहे.
वाघ नदीवर ५०० कोटींच्या खर्चाने मोठे बांध तयार करून तालुक्यातील सिंचन व्यवस्थेत वाढ करण्याचे आमचे लक्ष्य आहे. रोजगारोन्मुख शिक्षण देण्यासाठी शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज, नर्सिंग कॉलेज उघडले आहेत. संघर्ष करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणण्याचा आमचा उद्देश लवकरच पूर्ण होत आहे.
त्यासाठी २५ एकर जमीन कुडवा येथे मिळवून दिली. तसेच कॉलेज चालविण्यासाठी शासनाने डीन म्हणून डॉ. केवलिया यांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी ५०० पदांची निर्मिती करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश रहमतकर यांनी आ.गोपालदास अग्रवाल यांच्या विकास कार्यांवर प्रकाश टाकला.
सभेत जि.प. सदस्य रमेशकुमार लिल्हारे, रूद्रसेन खांडेकर, अर्जुनी नागपुरे, मुनेंद्र नांदगाये, पं.स. सभापती सरिता अंबुले, उपसभपती चमन बिसेन, कौशल्य बोपचे, लोकचंद दंदरे, मनिष मेश्राम, फत्तेचंद शेंडे, लक्ष्मी रहांगडाले, विद्या भालाधरे, रामेश्वर हरिणखेडे, दिगंबर बघेले आदींनी संबोधित केले.
कार्यक्रमात प्रामुख्याने जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, कृउबासचे उपसभापती धनलाल ठाकरे, संचालक अरूणकुमार दुबे, विठोबा लिल्हारे, आशिषसिंह नागपुरे, जगदीश अग्रवाल, खेमन बिरनवार, सावलराम महारवाडे, आशिष चव्हाण, गेंदलाल शरणागत, छन्नू खरकाटे, सत्यम बहेकार तसेच तालुक्यातीलल सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)