बचत गटाने केला महिलांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 01:52 IST2016-03-14T01:52:41+5:302016-03-14T01:52:41+5:30
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने जे पाऊल उचलले ते योग्य आहे. महिला बचत गटामुळे

बचत गटाने केला महिलांचा विकास
इंदोरा-बु. : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने जे पाऊल उचलले ते योग्य आहे. महिला बचत गटामुळे महिलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. बचत गटाच्या मदतीने महिलांनी आमूलाग्र प्रगती केल्याचे तिरोडा तालुक्यात उदाहरण आहे.
सन १८४८ च्या काळात महात्मा जोतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. भ्रूणहत्या, सतीची प्रथा, बंद झाली पती मेल्यावर पत्नीचे डोक्यावरील केस कापून तिला कुरूप बनविल्या जात असे. स्त्रीने चूल व मूलच सांभाळावे असे असताना यंत्रयुगाच्या काळात महिला सक्षम झाली आहे. सावित्रीच्या लेकी आता स्वत:चा विकास स्वत: करू शकतात. त्यांना साथ हवी आहे. शासनाच्या विविध योजनांतून स्त्रियांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांनी पडद्यांच्या आत न राहता समोर यावे म्हणून विविध प्रकारच्या योजना, प्रशिक्षण दिले. परंतु आजही स्त्रियांचा पाहिजे तेवढा विकास होऊ शकला नाही. बचत गटाच्या माध्यमातून विकास व्हावा म्हणून पुरूष गट स्थापन केले. त्या गटांना सबसिडीवर उद्योग धंदे करण्यासाठी कर्ज देण्यात आले पण सबसिडी घेण्याचा नादात बचत गटाच्या सदस्यांवर कर्ज झाले.
पण शासनाने तीन वर्षापासून महिला विकास महामंडळ व नाबार्डच्या माध्यमातून महिला बचत गटाला कर्ज देण्याची योजना आखली. ही योजना महिला बचत गटांना अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरली. या एजन्सीने सुरूवातीपासूनच नियमामुळे कामात पारदर्शकता ठेवली. बचत गट स्थापन करणे, त्याचे रजिस्टर वेळेवर तयार करणे, तपासणी करणे बँकेचे विविध कामे महिलांकडून करून घेणे, यामुळे तालुक्यात महिला विकास महामंडळाला बचत गट जुळले आहेत. बचत गटाचा रेकार्ड पारदर्शिका असतो, प्रत्येक महिलांना बँकेत जाण्याची संधी मिळते. त्यामुळे महिलांनी कर्ज घेणे कर्जाची परतफेड करणे, बँकेचा व्यवहार यांचा अनुभव यामुळे महिलांना आला आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत. महिलांच्या पुढाकाराने गावातील १०० टक्यांनी कर्ज देणारे सावकार हे रस्त्यावर आले व पतसंस्थांची लुटमार थांबली. मविमनने गावागावातील महिलांना जोडण्यासाठी विविध स्पर्धात्मक खेळाचे आयोजन केले. बचत गटामुळे महिलांचे मनातील भीती कायमची निघाली. बँकेत व इतर ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांकडून कार्यालयीन कामे करवून घेतात. (वार्ताहर)