संघटन शक्तीतून जनतेचा विकास साधा
By Admin | Updated: April 2, 2016 02:19 IST2016-04-02T02:19:40+5:302016-04-02T02:19:40+5:30
केंद्र व राज्य सरकारने शेतकरी, महिला व बेरोजगारांना केंद्रस्थानी ठेवून विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत.

संघटन शक्तीतून जनतेचा विकास साधा
हेमंत पटले : स्थापना दिवस गाव पातळीवर साजरा होणार, भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक
गोंदिया : केंद्र व राज्य सरकारने शेतकरी, महिला व बेरोजगारांना केंद्रस्थानी ठेवून विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. केंद्र व राज्याचा अर्थसंकल्पातही हे दिसून आले आहे. मात्र, या सर्व योजनांचा लाभ व त्याचे यशस्वी क्रियान्वयन होवून विकास साधण्याकरिता कार्यकर्त्यांनी गावागावात माहिती देवून त्यांचा लाभ गरजुंना मिळवून द्यावा. संघटन शक्ती ही फार मोठी असून या ताकदीतून कार्यकर्त्यांनी जनतेचा विकास साधण्याकरिता अहोरात्र काम करावे, असे आवाहन भारतीज जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बुधवारी आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने माजी आमदार हरिश मोरे, माजी आमदार भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, नगराध्यक्ष कशीश जायस्वाल, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, महिला मोर्चा प्रदेश सचिव सीता रहांगडाले, जिल्हा परिषद सभापती देवराम वडगाये, छाया दसरे, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, भाऊराव उके, लायकराम भेंडारकर, रविकांत बोपचे, अशोक इंगळे, नेतराम कटरे, सविता पुराम, दिनेश दादरीवाल, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला, मनोहर आसवानी, हमीद अलताफ, अमीत बुद्धे, सुनील बन्सोड, भावना कदम, हनुवत वट्टी, मदन पटले, धनंजय तुरकर आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, ६ एप्रिल रोजी भाजपाच्या स्थापना दिवस गावपातळीवर साजरा करायचा आहे. यात प्रत्येक पंचायत समिती क्षेत्रातील एका गावात व प्रभागात सकाळी ९ वाजता स्थापना दिनाचा कार्यक्रम घेवून पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करायचे आहे. तदनंतर तालुकास्थळी रक्तदानाचे कार्यक्रम घ्यायचे आहे. स्थापना दिनानिमित्त संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करुन दीड लाख रक्ताच्या पिशवी रक्त गोळा करण्याचा संकल्प प्रदेश भाजपाने घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रत्येक कार्यक्रमातून लोककल्याणाच्या योजनांची माहिती नागरिकांना द्यावी. याचप्रमाणे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त प्रत्येक गावात व वॉर्डात जयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन केले.
या वेळी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
बैठकीचा समारोप माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले. या वेळी त्यांनी संघटनेचे महत्व सांगून शासकीय योजनांचा माध्यमातून जनतेचा विकास साधण्याचे आवाहन केले.
सभेचे संचालन जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी केले. कार्यक्रमासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
या बैठकीत लक्ष्मण भगत, भाऊदास कठाणे, छत्रपाल तुरकर, उमाकांत ढेंगे, सुनील केलनका, परसराम फुंडे, विजय बिसेन, पप्पू अटरे, सलाम शेख, भरत क्षत्रीय, नंदकुमार बिसेन, मोरेश्वर कटरे, अजित मेश्राम, किशोर हालानी, चेतन वडगाये, अमीन शेख, विनोद किराड, प्रकाश गहाणे, गायत्री चौधरी, उमाकांत हारोडे, मिून बडगुजर, नितीन कटरे, छोटू बहेकार, अशोक हरिणखेडे, विजय ज्ञानचंदानी, काशीफ जमा कुरेशी, खेमराज लिल्हारे, शंकर मडावी, विनोद भांडारकर, अमृत इंगळे, अजाब रिनाईत, सुरेश पटले, नरेंद्र बाजपेयी, ऋषीकांत साहू, पंकज सोनवाने, महेश चौरे, राजेंद्र बडोले, बाबुलाल पंचभाई आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)