शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या योजना आणून विकास करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:52 IST

गोंदिया-भंडारा जंगल व तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्याचा शेतकऱ्यांचा सिंचनासाठी कसा उपयोग होईल तसेच यावर आधारित केंद्र शासनाच्या योजना आणून कसा विकास साधता जाईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी दिले.

ठळक मुद्देनवनिर्वाचित खा.सुनील मेंढे यांचे जंगी स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : गोंदिया-भंडारा जंगल व तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्याचा शेतकऱ्यांचा सिंचनासाठी कसा उपयोग होईल तसेच यावर आधारित केंद्र शासनाच्या योजना आणून कसा विकास साधता जाईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी दिले.अर्जुनी-मोरगाव येथील वात्सल्य सभागृहात शुक्रवारी (दि.२४) आयोजित सत्कार सभारंभात ते बोलत होते. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी ते आले होते. ढोल-ताशाच्या गजरात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. वात्सल्य सभागृहात एका सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे, पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, पं.स.चे सभापती अरविंद शिवणकर, नगरसेवक देवेंद्र टेंभरे, बाजीराव तुळशीकर, जि.प.चे माजी बांधकाम सभापती प्रकाश गहाणे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.मेंढे म्हणाले, लोकसभेची निवडणूक एक परीक्षा होती. त्या परीक्षेत मतदारांच्या आशिर्वादामुळे आपण उत्तीर्ण झालो. हे जनतेचा आशिर्वाद व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षे कुठलीही रजा न घेता देशासाठी जे काम केले त्याची ही पावती आहे. मी नेता नाही, यापूर्वी कुठलीही आमदारकीची निवडणूक लढलो नाही. केवळ भंडारा नगरपरिषदेचा अध्यक्ष आहे. वंशपरांपरागत राजकीय वलय नसताना सामान्य कार्यकर्त्यापासून खासदार बनलो. मला हा बहुमूल्य सम्मान कार्यकर्त्यांची मेहनत व मतदारांच्या आशिर्वादामुळे प्राप्त झाला. मागील खासदारांनी पक्षाशी बेईमानी केली. दुसºया पक्षात प्रवेश केला. व बाहेरच्या मतदारसंघातून निवडणूक लढली. त्यांना आमच्या नेत्याने त्यांची जागा दाखविली. त्यांच्या कार्यकाळात विकास कामांचा जो अनुशेष होता ती व नवीन भरीव विकासाची कामे करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.ना.राजकुमार बडोले म्हणाले, कार्यकर्त्यांची मेहनत व मतदारांच्या सहकार्यामुळे भाजपचा येथे विजय झाला. पोट निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसची मतांची आघाडी संपवून त्यापेक्षा अधिकची आघाडी आम्ही या विधानसभा क्षेत्रात घेतली. आपण ज्या विश्वासाने मताधिक्य दिले त्याच विश्वासाने जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करु.या विश्वासाला तडा जाणार नाही अशी हमी त्यांनी दिली.पत्रकार संघानेदिले निवेदननवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील संकुल परिसरात १० वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करुन गार्डन व कान्फरन्स हॉलचे एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले. या कालावधीत वापर न होता सुद्धा ते डागडुजीस आले आहे. शासन व प्रशासनच्या कुंभकर्णी निद्रेमुळे ते अद्यापही तसेच आहे. त्याचे लोकार्पण अजूनही होऊ शकले नाही.याची दखल घेण्याचे निवेदन तालुका पत्रकार संघातर्फे खा.सुनील मेंढे यांना देण्यात आले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले