शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

डीटीएड् महाविद्यालयातील सोयीसुविधांची तपासणी

By admin | Updated: May 31, 2014 00:00 IST

पटपडताळणीत दोषी आढळलेल्या शाळांवर अद्याप कारवाई झालेली नाही. तीन वर्षे केवळ चर्चेत निघून गेले. त्यामुळे संस्था चालकांचे प्रताप चव्हाट्यावर आले. डीटीएड महाविद्यालयामधील सोयीसुविधांची

गोंदिया : पटपडताळणीत दोषी आढळलेल्या शाळांवर अद्याप कारवाई झालेली नाही. तीन वर्षे केवळ चर्चेत निघून गेले. त्यामुळे संस्था चालकांचे प्रताप चव्हाट्यावर आले. डीटीएड महाविद्यालयामधील सोयीसुविधांची तपासणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा महाविद्यालयांनी धसका घेतला असून अंधारामागील कारभारावर उजेड पडण्याची सामान्यांची अपेक्षा आहे.राज्य शासनाने २0११ मध्ये शाळांची पटपडताळणी केल्यामुळे शासनाने अनुदान वाटणार्‍या शाळांचे बिंग फुटले. विद्यार्थ्यांंच्या उपस्थितीसोबतच भौतिक सुविधा, गणवेश, शालेय पोषण आहार, पाठय़पुस्तकांची स्थिती याबद्दलचे वास्तव समोर आले. तीन वर्षानंतरही पटपडताळणीत दोषी आढळलेल्या शाळांवर कारवाईबद्दल केवळ चर्चाच सुरु आहे. शाळांच्या पटपडताळणीनंतर महाविद्यालयाच्या तपासणीची चर्चा सुरु झाली. परंतु संस्था चालकांच्या दबावामुळे सरकारला हा निर्णय घेणे शक्य झाले नाही. अखेर नागपूर खंडपीठाच्या एका निर्णयानंतर शासनाला महाविद्यालयातील सोईसुविधांची तपासणी करावी लागणार आहे.महाविद्यालयातील भौतिक सुविधांचा प्रश्न वारंवार समोर येतो. महाविद्यालयातील भौतिक सुविधा परिपूर्ण असतील तर संलग्नीकरण कायम ठेवणे ही सगळी जबाबदारी विद्यापीठाची आहे. दरवर्षी विद्यापीठांच्या संलग्नीकरणासाठी महाविद्यालयांना भेटी दिल्या जातात. तेथे पाहणी करुन काही सूचना करुन महाविद्यालयांना शिफारस करतात. अनेक महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधांची वानवा असली तरी त्यांना संलग्नीकरण मिळते.विद्यापीठाच्या संलग्नीकरण समित्यांच्या आशीर्वादाने वर्षानुवर्षे तरणार्‍या कॉलेजमधील सत्य या तपासणीमुळे बाहेर येणार आहे. विद्यापीठातील अधिकारी मंडळीचा संस्था चालकांना दबदबा याचे प्रतिबिंब विद्यापीठाच्या समित्यांमध्ये दिसते. या तपासणीत कॉलेजच्या जागेपासून इमारत, क्रीडांगण, वसतीगृह, वर्गखोल्याची संख्या, प्रसाधनगृहाची संख्या, पाण्याची सुविधा, रेकॉर्ड रुम, परीक्षा वर्ग, विद्यार्थी, सामान्य खोली व सुविधा, प्रयोगशाळांची स्थिती, प्राचार्य व शिक्षकांच्या रिक्त जागा, संकेतस्थळ याचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे. या पलीकडे जाऊन आर्थिक बाबींचा तपशीलही कॉलेजांना द्यावा लागणार आहे. विद्यापीठाच्या संलग्नीकरण समितीच्या तपासीणनंतर शासकीय पातळीवरुन तपासणी होत असल्याने संस्था चालकांमध्ये नाराजीचा सुर आहे. कायम विनाअनुदानीत महाविद्यालयांची तर तपासणी विरोधात दंड थोपटल्यासारखी स्थिती आहे. शासन आम्हाला एक रुपयांची मदत देत नाही. कुठलेही सहकार्य नाही. मग आम्ही कसे सहकार्य करायचे, असा प्रश्न महाविद्यालयांनी उपस्थित केला आहे.तपासणीनंतर पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळांसोबत राज्यातील डीटीएड महाविद्यालयांचीही तपासणी करण्यात आली. शाळांवरील कारवाईचा प्रश्न चर्चेत आहे, तर डीटएड महाविद्यालयांचा अहवाल गुलदस्त्यात आहे. मात्र या तपासणीमुळे महाविद्यापयातील सोईसुविधांची बाब उघडकीस येऊन महाविद्यालयातील उणिवा दूर करणे आवश्यक राहणार आहे. शिवाय शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणार्‍या महाविद्यालयातील सत्य बाहेर येऊन, त्यामुळे उच्च शिक्षणाच्या दृष्टीने दिशादर्शक बाब ठरविणे शक्य होणार नाही. (प्रतिनिधी)