तिरोडा परिसरातील हातभट्ट्या उद्ध्वस्त

By Admin | Updated: July 6, 2015 01:21 IST2015-07-06T01:21:49+5:302015-07-06T01:21:49+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पोलिसांच्या सहकार्याने तिरोडा परिसरातील दारूच्या हातभट्ट्यांविरूद्ध उघडलेल्या धडक मोहिमेत ...

Destroyed the handball in the Tiroda area | तिरोडा परिसरातील हातभट्ट्या उद्ध्वस्त

तिरोडा परिसरातील हातभट्ट्या उद्ध्वस्त

गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पोलिसांच्या सहकार्याने तिरोडा परिसरातील दारूच्या हातभट्ट्यांविरूद्ध उघडलेल्या धडक मोहिमेत दि.४ रोजी ३ बेवारस गुन्हे नोंदविले. संत रविदास वॉर्डातील हातभट्टी उद्ध्वस्त केली.
या कारवाईत नोंदविलेल्या ३ बेवारस गुन्ह्यात १२ हजार ७०० लिटर मोहा सडवा व सहा लोखंडी ड्रम असा एकूण २ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे दुय्यक निरिक्षक चिटमटवार, गोंदिया शहरचे दुय्यम निरीक्षक निडुंभ, दुय्यक निरीक्षक बोडेवार, सहायक दुय्यम निरीक्षक हुमे, रहांगडाले, जवान तऱ्हाटे, मुनेश्वर, ढाले, फुंडे, पागोटे व वाहनचालक सोनबर्से, मडावी यांनी केली. त्यांना तिरोडा पोलिसांनीही मदत केली. जिल्ह्यातील अवैध हातभट्ट्या व दारूच्या अड्ड्यांवर अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले.

Web Title: Destroyed the handball in the Tiroda area