आहार पुरवठ्यापासून वंचित

By Admin | Updated: February 18, 2015 01:42 IST2015-02-18T01:42:52+5:302015-02-18T01:42:52+5:30

मुख्यालयी व कार्यक्षेत्रात राहण्याचे शासनाचे आदेश असतानाही या नियमाला धुडकावून आजही कित्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमर्जी कारभार सुरूच आहे.

Deprived of food supply | आहार पुरवठ्यापासून वंचित

आहार पुरवठ्यापासून वंचित

परसवाडा : मुख्यालयी व कार्यक्षेत्रात राहण्याचे शासनाचे आदेश असतानाही या नियमाला धुडकावून आजही कित्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमर्जी कारभार सुरूच आहे. असाच प्रकार तालुक्यातील सेजगाव क्षेत्रातील आंगणवाडी पर्यवेक्षिकेकडून सुरू आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना पोषक आहारापासून वंचित राहावे लागत आहे.
महिला बाल प्रकल्प विभाग तिरोडा अंतर्गत येत असलेल्या सेजगाव परिक्षेत्रात २० गावे असून यात अर्जुनी जि.प. क्षेत्रातील आठ गावे अतिरिक्त आहेत. मात्र या क्षेत्राच्या आंगणवाडी पर्यवेक्षिका लता उके मुख्यालयी न राहता, गोंदियावरुन क्षेत्रातून येणे-जाणे करतात. तिरोडाच्या कार्यालयात जात असतात. पर्यवेक्षकांनी फक्त कार्यालयात सभेला व माहिती देण्यासाठी महिन्याकाठी जाणे असणे आवश्यक आहे. प्रत्येक आंगणवाडीला भेटी देणे आवश्यक आहे व आहारपुरवठा तपासणी, कुपोशीत बालकांंच्या घरी जाऊन भेटी देणे, आंगणवाडीत आहार पुरवठा पाहणी करणे आदि कामे करावयाची आहेत. मात्र त्या आपला मनमर्जी कारभार चालवित असल्याचे दिसून येते.
बालकांना सकाळी १० वाजता नाश्ता देणे आवश्यक आहे. पण त्यांना दिला जात नसून १.३० वाजता त्यांना आहार दिला जाते. किशोरवयीन मुलींसाठी शासनाकडून आहार पुरवठासाठी पैसे दिला जातो. तो आहार गावात दिला जातच नाही. अशात शासनाचे लाखो रूपये कोठे जातात ही बाब समजण्यापलीकडे आहे.
परसवाडा परिसरातील व सेजगाव क्षेत्रातील आंगणवाडीतील आहार पुरवठा देणाऱ्या बचत गट प्रमुखांशी संपर्क केला असता पर्यवेक्षिका उके आंगणवाडी सेविकांमार्फत पैसे वसुली करीत असल्याचे कळले. एका आंगणवाडीतून ५०० ते हजार रुपये वसूल करीत असल्याचे नाव न लिहीण्याच्या अटीवर काहींनी सांगितले. क्षेत्रातील बघोली, परसवाडा, खैरलांजी, किंडगीपार, बोंडरांनी, अत्री, बोदा, बोरा, गोमाटोला येथील आंगणवाडी सेविकांना सभेसाठी सेजगाव येथे बोलावून दबावतंत्राचा करतात. परसवाडा क्षेत्राच्या आंगणवाडीची सभा परसवाडायेथेचे घेणे आवश्यक आहे. पण आपला त्रास वाचविण्यासाठी या क्षेत्रातील सेविकांना त्रास देत असून व काही पालकांनी वरिष्ठांना आहार विषयी तोंडी तक्रार दिली असता वरिष्ठांना धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे. ती महिला माझा काणी काहीच करु शकत नाही व माझ्या जवळ नेते आहेत अशी धावकावणी त्या देतात.
परसवाडा येथील अरुण मिश्रा यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका उके यांच्या विरोधात महिला बालविकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे. तर परसवाडा व सेजगाव क्षेत्रातील पालकवर्गाने कार्यवाही करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी पंचायत समिती सदस्य रमेश पटले यांनी या विभागाच्या चौकशीसाठी आमरण उपोषण केले होते. मात्र त्यानंतरही अधिकाऱ्यांकडून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत तालुका बालविकास प्रकल्प प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)

Web Title: Deprived of food supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.