बोनस व धानाचे चुकारे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:29 IST2021-04-25T04:29:14+5:302021-04-25T04:29:14+5:30
खरीप हंगामात शेतकरी बांधवांना धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विक्री करताना खूप मनस्ताप सहन करावा लागला होता. गोंदियाच्या ...

बोनस व धानाचे चुकारे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा
खरीप हंगामात शेतकरी बांधवांना धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विक्री करताना खूप मनस्ताप सहन करावा लागला होता. गोंदियाच्या सभोवताल असलेल्या गावांच्या शेतकरी बांधवांचा सातबारा ऑनलाइन नसल्याने धान खरेदी वेळेवर होऊ शकली नव्हती. बारदाना वेळेवर उपलब्ध नसणे, गोदाम फूल असणे यासारख्या विविध समस्या यंदा यायला नको म्हणून आधीच प्रशासनाने तयारी करावी, अशी सूचनादेखील आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे.
.........
चुकाऱ्याचे थकीत ३४२ कोटी रुपये त्वरित जमा करा
मागील वर्षभरापासून सर्वच जण कोरोनाशी लढा देत आहेत. शेतकरी बांधवसुद्धा कोरोनामुळे न डगमगता शेतीची कामे सुरूच ठेवली. त्यामुळे शेतमालाचे बंपर उत्पादन झाल्याने अर्थव्यवस्थेला हातभार लागला. मात्र मागील वर्षी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही धानाचे १४२ कोटी रुपयांचे चुकारे आणि बोनसच्या २०० काेटी रुपयांची रक्कम मिळाली नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनाने बोनस आणि चुकाऱ्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची मागणी आ. विनोद अग्रवाल यांनी केली आहे.