सैन्य कामगिरीवर देवरी-तिरोड्यात जल्लोष

By Admin | Updated: October 2, 2016 01:29 IST2016-10-02T01:29:15+5:302016-10-02T01:29:15+5:30

भारताने नियंत्रण रेषा पार करून पाकमधील दहशतवादी शिबिरावर सर्जीकल हल्ला केला व यात अनेक दहशतवाद्यांना ठार केले.

Deoria-Tirodaya dalliance on military performance | सैन्य कामगिरीवर देवरी-तिरोड्यात जल्लोष

सैन्य कामगिरीवर देवरी-तिरोड्यात जल्लोष

‘भारत माता की जय’चा जयघोष : भाजप व युवा मोर्चाने काढली रॅली
देवरी : भारताने नियंत्रण रेषा पार करून पाकमधील दहशतवादी शिबिरावर सर्जीकल हल्ला केला व यात अनेक दहशतवाद्यांना ठार केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात भारतीय सेनेनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देवरी येथे भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे जल्लोष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
आ. संजय पुराम, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार यांच्या नेतृत्वात या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप कार्यालयातून यात्रेला प्रारंभ झाला. अग्रसेन चौक, दुर्गा चौक, पंचशिल चौक, राणी दुर्गावती चौक मार्गे यात्रा भ्रमण करण्यात आली. रॅलीत भारत माता की जय, वंदे मातरम असे देशभक्ती घोषणा देत फटाक्यांचा आतिशबाजी करीत यात्रेचे समापन करण्यात आले. यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्व आघाड्यांचे प्रमुख व कार्यकर्ते सहभागी होऊन भारतीय सेनेचे कौतुक करण्यात आले.
तिरोड्यात वाटले पेढे
तिरोडा : भारताने पाकीस्तानच्या हल्याला चोख प्रत्यूत्तर देऊन सर्जिकल स्ट्राईक केले. पाकीस्तान सातत्याने शस्त्रबंदीचे उल्लंघन करून अतिरेकी तसेच घातपाती कारवाया करीत आहे. पाकीस्तानच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्यूत्त दिले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स करून पाकीस्तानला सडेतोड उत्तर देऊन ४० आतंकवाद्याच्या खात्मा केले. हे सेनेचे व मोदी सरकारचे कौतुकास्पद कार्य आहे. विशेष म्हणजे अशावेळी सर्व विरोधी राजकीय पक्ष सुध्दा सरकारच्या सोबत आहेत, असे आ. विजय रहांगडाले म्हणाले.
स्थानिक शहीद स्मारकाच्या पटांगणावर भारतीय सेनेचा गौरव विजय जल्लोष कार्यक्रम आ. विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली माजी आ. भजनदास वैद्य, माजी आ. हरिष मोरे, कृऊबासचे प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, भाऊराव कठाने, मदन पटले, सारंग मानकर, मोनू भुते, शामराव भोंडेकर, अ‍ॅड. रमेश भांडारकर, विशेष छुगानी, वनमाला डहाके, शशिकला मेश्राम, प्रभा घरजारे, नितीन पारधी, प्रशांत भुते, सलाम शेख, विजय बंसोड, संजयसिंह बैस, लक्ष्मीनारायण दुबे, विशाल वेरूळकर, निरज सोनेवाने, स्वानंद पारधी, विजय ज्ञानचंदानी, राजेश रहांगडाले उपस्थित होते. फटाके फोडून, ढोलताशे वाजवित पेढे वाटले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Deoria-Tirodaya dalliance on military performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.