शुक्रवारी (दि.२२) तहसील कार्यालयातील भरारी पथकाने बाघनदी काठावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता वेगवेगळ्या ठिकाणी रेतीचे ढीग आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. रेतीच्या सर्व ढिगांची ट्रॅक्टरद्वारे उचल करून ११० ब्रास रेती तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली. ग्राम शिलापूर येथील शेतकरी राधेश्याम चैतराम बोहरे, जवाहरलाल कन्हैयालाल शाहू व ग्राम भागी येथील नरेश रामदास धरमशहारे यांच्या शेतात हा रेतीचा साठा आढळून आला. त्यांना बयानाकरिता तहसील कार्यालयात बोलाविण्यात येणार आहे. या रेतीचा उपसा कुणी केला याची माहिती तहसील कार्यालयाकडून काढली जात आहे.
-------------------------
कोट
बाघनदीच्या पात्रातून काढलेली रेती तीन शेतकऱ्यांच्या शेतात आढळली. त्या शेतकऱ्यांचे बयान घेतले जाणार आहे. माहिती काढण्यासाठी आम्ही शिलापूर, डवकी, भागी, मकरधोकडा या चार गावांतील १४ लोकांना नोटीस देऊन त्यांना विचारणा करणार आहोत. या प्रकरणात त्यांचा सहभाग असेल त्यांचा ट्रॅक्टर परवाना रद्द करण्यात येईल.
विजय बोरूडे, तहसीलदार देवरी.