देवरी तालुका भाजपाने साजरा केला स्थापना दिवस

By Admin | Updated: April 8, 2015 01:26 IST2015-04-08T01:26:23+5:302015-04-08T01:26:23+5:30

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी देवरी तालुका भाजपाव्दारे ध्वजारोहण व बैठक घेऊन साजरा करण्यात आला.

Deori taluka BJP celebrates establishment day | देवरी तालुका भाजपाने साजरा केला स्थापना दिवस

देवरी तालुका भाजपाने साजरा केला स्थापना दिवस


देवरी : भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी देवरी तालुका भाजपाव्दारे ध्वजारोहण व बैठक घेऊन साजरा करण्यात आला.
यावेळी शेकडो भाजप कार्यकर्ते पक्ष कार्यालयासमोर एकत्र झाले. प्रथम ध्वजारोहण वरीष्ठ कार्यकर्ता बुधराम भुते यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगानानंतर बैठकीचे आयोजन भाजप कार्यालयात करण्यात आले. बैठकीचे अध्यक्षस्थान तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती म्हणून महिला बालकल्याण सभापती सविता पुराम, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, बुधराम भुते, सुकचंद राऊत, अ‍ॅड. भुषण मस्करे, उषा शहारे, दिपक शर्मा उपस्थित होते.
यावेळी महिला बालकल्याण सभापती सवीता पुराम यांनी भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचे सांगून येणाऱ्या जि.प.व पं.स. निवडणुकीकरीता एकजुट राहून पक्षाला विजयी करण्याचे कार्यकर्त्यांना सांगीतले. जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या इतिहासावर प्रकाश टाकून भारतीय जनता पक्षाचे मूळ श्यामाप्रसाद मुखर्जीव्दारा १९५१ ला निर्मित भारतीय जनतेच असल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद संगीडवार म्हणाले की, पक्षाच्या ३५ वर्षाच्या ऐतिहासीक प्रवासात पक्षाने खूप नावलौकिक मिळविला आहे. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी श्रीकृष्ण हुकरे, कुवर भेलावे, गुलाब शाहू, विनोद भांडारकर, राजकुमार रहांगडाले, अनिल बिसेन, सुनिता गावडकर, गोमती तीतराम, रचना उजवणे, कौसल्या कुंभरे, प्रज्ञा संगीडवार, कृष्णदास चोपकर, दिनेश भेलावे, सुशील जैन, विलास शिंदे, कृष्णा सर्पा, प्रशांत काळे, मनोज मिश्रा, कमल येरणे, महेंद्र मेश्राम, राजु शाहु, इंदरजीतसिंग भाटीया, शकील शेख, विकास अग्रवाल, विजय मेश्राम, बैजु तिराले, डिलेश्वरी बिंझाडे, रोहीणी कावळे, जसवंता शिवणकर, नुतन सयाम, ईमला बाडाबाग, नमीता नेताम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Deori taluka BJP celebrates establishment day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.