देवरी-आमगाव मार्गावर कार झाडावर आदळली, दुचाकीस्वारही गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 02:25 IST2016-07-12T02:25:34+5:302016-07-12T02:25:34+5:30
देवरी-आमगाव राज्य मार्गावरील बोरगाव शिवारात कारने मोटार सायकलला समोरासमोर धडक दिली. ही घटना शनिवारला

देवरी-आमगाव मार्गावर कार झाडावर आदळली, दुचाकीस्वारही गंभीर
देवरी : देवरी-आमगाव राज्य मार्गावरील बोरगाव शिवारात कारने मोटार सायकलला समोरासमोर धडक दिली. ही घटना शनिवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. यात मोटारसायकल चालक श्रीराम मंगरु पंधरे (सावली) गंभीर जखमी झाल्याने त्याला केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
श्रीराम पंधरे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास देवरी वरुन सावलीला आपल्या घराकडे मोटार सायकल क्रमांक सीजे-०७/७६४७ ने देवरी -आमगाव मार्गाने जात होता. दरम्यान बोरगाव शिवाराजवळ आमगावकडून देवरीकडे येणाऱ्या इंडिको कार क्रमांक एमएच ३५/पी-१२३५ ने त्याच्या वाहनाला धडक दिली.
मोटार सायकल चालक श्रीराम पंधरे हा गंभीर जखमी झाला. तर कार चालकाला नियंत्रण सुटल्याने इंडिको कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. सदर इंडिगो कार ही देवरीच्या सत्येन्द्र योगेश बोंबार्डे यांची आहे. सद्यस्थितीत अपघातात वाढ झाली आहे. वाहन भरधाव वेगात चालविल्याने अपघात मोठ्या संख्येत घडत आहेत. मद्यप्राशन केल्यामुळेही अपघात घडत आहेत. पावसाळ्यात भरधाव धावणाऱ्या वाहनांनना ब्रेक लावल्यास वाहन घसरून अपघात होतो. (तालुका प्रतिनिधी)