मुख्याध्यापिकेला हटविण्याची मागणी

By Admin | Updated: November 15, 2014 01:45 IST2014-11-15T01:45:00+5:302014-11-15T01:45:00+5:30

महाराष्ट्राच्या अंतिम सीमेवर असलेल्या अतिदुर्गम क्षेत्रातील ककोडी गावातील जि.प.हायस्कूल येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक रेखा ठवरे ....

Demand for removal of headmaster | मुख्याध्यापिकेला हटविण्याची मागणी

मुख्याध्यापिकेला हटविण्याची मागणी

देवरी : महाराष्ट्राच्या अंतिम सीमेवर असलेल्या अतिदुर्गम क्षेत्रातील ककोडी गावातील जि.प.हायस्कूल येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक रेखा ठवरे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध ककोडीवासी व शाळा व्यवस्थापन समितीने त्यांना तत्काळ हटविण्याची मागणी केली आहे.
सविस्तर असे की, रेखा ठवरे या जि.प. हायस्कुल ककोडी येथे मागील काही वर्षापासून कार्यरत आहेत. परंतु शाळेचे प्रशासकिय व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याकरीता प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु या समितीला विश्वासात न घेता मुख्याध्यापिकेने आर्थिक प्रशासकीय व्यवहारात घोळ केल्याची तक्रार ग्रामवासी व शाळा व्यवस्थापन समितीने दि. ७/२/२०१४ ला मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकारी गोंदिया यांच्याकडे केली होती. त्यावर दि. २/४/२०१४ ला या प्रकाराची चौकशी करण्याकरीता काही अधिकारी आले होते. त्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांचे बयान लिहून नेले व कारवाई करण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले. परंतु ९ महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा कारवाई झालेली नाही. त्यावर पुन्हा ग्रामवासियांनी दि. ३०/९/२०१४ ला सीईओ गोंदिया यांना पुन्हा पत्र देऊन लवकर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
ग्रामवासियांनी निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन वर्षापासून या शाळेत इंग्रजी व विज्ञान विषयाचे शिक्षक नाही. शाळेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे संगणक शोभेची वस्तू बनलेले आहेत. शाळेचे वेळापत्रक अद्याप बनविण्यात आलेले नाही.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व ककोडी जि.प. क्षेत्राचे सदस्य संदीप भाटिया यांच्याशी चर्चा केली असता भाटीया म्हणाले की, ग्राववासियांना सोबत घेऊन गोंदिया येथे सीईओ व शिक्षणाधिकाऱ्यांनी यापुर्वी दोन वेळा चर्चा करण्यात आलेली आहे. सीईओनी शिक्षकांची पुर्तता करण्याची व मुख्याध्यापिकेला हटविण्यासंबंधीचे आश्वासन दिलेले आहे. जर ही मागणी अधिकाऱ्यांनी पुर्ण केली नाही तर ग्रामवासियांसोबत जि.प. च्या विरोधात आंदोलन छेडले जाईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for removal of headmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.