कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:29 IST2021-05-26T04:29:57+5:302021-05-26T04:29:57+5:30

रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा गोरेगाव : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात ...

Demand for migrant shelter at Kohmara | कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा

गोरेगाव : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी आहे.

वातावरणातील बदलामुळे भीती

तिरोडा : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

बाजारातील रस्ते मोकळे करा

गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी अडचण होते.

रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत

अर्जुनी-मोरगाव : राज्य मार्गालगत वाढलेली झुडपे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वळणाच्या ठिकाणी असलेल्या या झुडुपांमुळे वाहन दिसत नाही. झुडपे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.

घाटावरून रेतीची तस्करी सुरूच

तिरोडा : तालुक्यातील घाटकुरोडा येथील रेती घाट क्रमांक १ चा अद्यापही लिलाव झालेला नाही, मात्र या घाटावर दररोज मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा सुरू आहे. परिणामी शासनाचा महसूृल बुडत आहे. त्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी सरपंच प्रकाश भोंगाडे यांनी केली आहे. घाटकुरोडा येथील रेती घाट क्रमांक १ वरून रेती माफिया मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने रेतीची तस्करी करत आहेत. परिणामी शासनाचा महसूल सुद्धा बुडत आहे. त्यामुळे स्वामित्वधनाची आकारणी करून शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत घाटकुरोडाला हा घाट देण्यात यावा, जेणेकरून शासनाला राजस्व प्राप्त होऊन रेती तस्करीला आळा घालण्यास मदत होईल, अशी मागणी सरपंच प्रकाश भोंगाडे यांनी केली आहे.

Web Title: Demand for migrant shelter at Kohmara